नाशिक : महापालिकेने शहरात सध्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम चालविली आहे. परंतु, लवकरच शहरातील सुमारे सातशेच्या वर अनधिकृत बांधकामांवरही हातोडा पडणार असून, त्याबाबतची प्रकरणे नगररचना विभागाने अतिक्रमण विभागाकडे तत्काळ पाठविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिकेने सध्या रस्ते व फुटपाथ मोकळे करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. त्यापाठोपाठ नियमांचे उल्लंघन करत मोठ्या-मोठ्या इमारतींमधील बांधकामांकडे मोर्चा वळविण्यात येणार आहे. त्यानुसार नगररचना विभागाने त्याबाबतची प्रकरणे तत्काळ अतिक्रमण विभागाला पाठवावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शहरात सुमारे ७०० हून अधिक अनधिकृत बांधकामांची प्रकरणे असून, त्यांच्यावर आता हातोडा पडणार आहे. शासनाने अनधिकृत बांधकामांबाबत धोरण जाहीर केले असले तरी, त्या धोरणातही न बसणाºया आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करत अनधिकृत बांधकामे उभारणाºयांना दणका दिला जाणार आहे.
सातशे अनधिकृत बांधकामांवर हातोडा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST
नाशिक : महापालिकेने सध्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम चालविली आहे.
सातशे अनधिकृत बांधकामांवर हातोडा?
ठळक मुद्दे प्रकरणे अतिक्रमण विभागाकडे पाठविण्याचे आदेश अनधिकृत बांधकामांबाबत धोरण जाहीर