शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे तळेगाव अद्याप अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:12 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

विल्होळी : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.अंजनेरी तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून अर्ध्या गावात वीजपुरवठा खंडित असून, वीज कंपनीचे अधिकारी वीजपुरवठा चालू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अर्धे गाव पूर्णपणे अंधारात असून, त्याबाबत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या.दलित वस्तीतील एक विद्युत खांब पूर्णपणे सडला असून, तो कोण्यातही क्षणी पाऊस, वाºयामुळे कोसळण्याची शक्यता आहे. सदर वीज पोलमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून त्याला लागूनच असलेल्या शाळेला गेल्या महिन्याभरापासून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तक्रार करून उपयोग होत नाही, पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही, असे उघडपणे सांगितले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बहुतांशी घरांमध्ये वीज नसल्यामुळे त्याचा अन्य घटकांवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत आहे.येत्या आठवडाभरात ठरावानुसार कार्यवाही करावी अन्यथा तळेगावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ खंबाळे विद्युत केंद्रावर आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला.या ग्रामसभेत सरपंच मंगल निंबेकर, उपसरपंच त्र्यंबक पगार, तुकाराम दाते, वामन दाते, रामदास पगार, प्रवीण दाते, संतोष निंबेकर, रामदास दाते, निवृत्ती पगार, योगेश पगार, सोमनाथ दाते, रामभाऊ दाते, ग्रामसेवक आहिरे, महिला बचत गट, पोलीस पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांना ठरावाचे निवेदन पाठविलेवीज कर्मचाºयांकडून गावाला विचारात न घेता किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता काही व्यावसायिकांना बेकायदेशीर वीज जोडणी करून दिली आहे. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करणाºया अधिकाºयांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व एक महिन्यापासून बंद असलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशा ठरावाचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन