शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

अर्धा डझन गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:03 IST

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, पोलीस यंंत्रणेलाही निवडणुकीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदासुव्यवस्था टिकून रहावी, याकरिता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सराईत अर्धा डझन गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, पोलीस यंंत्रणेलाही निवडणुकीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदासुव्यवस्था टिकून रहावी, याकरिता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सराईत अर्धा डझन गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.आगामी काळात लोकसभा व त्यानंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. त्यामुळे शहरात निवडणूक काळात गुन्हेगारीला पायबंद घालता यावा, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर वक्रदृष्टी केली असून कारवाईला प्रारंभ केला आहे. परिमंडळ एकमधील या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सहा सराईत गुन्हेगारांना उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तडीपार केले आहे. या संशयितांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना तडीपार केले.३८ गुन्हेगार रडारवरपरिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अजून ३८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या संशयितांविरोधात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे परिमंडळ एकमधील तब्बल ९० गुन्हेगारांना पोलिसांनी यापूर्वी तडीपार केल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी