ओझर टाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगारांनी आज काळ्या फिती लावून केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपास पाठिंबा दिला व केन्द्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदविला. केन्द्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज झालेल्या देशव्यापी संपास पाठिंबा देण्यासाठी एच.ए.एल. कामगारांनी कामगार संघटनेच्या आदेशानुसार आज काळ्या फिती लावून काम केले. या आंदोलनात कारखान्यातील सर्व कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले व देशव्यापी संपास पाठिंबा दिला ़दरम्यान, काळ्या फितर लावून काम करऱ्याचे आंदोलन यशस्वी झाले असल्याचे कामगार संघटनेचे सरचिटणीस संजय कुटे यांनी सांगितले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी, सर्व कामगार यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
एच.ए.एल. कामगारांचे काळी फित लावून काम
By admin | Updated: September 2, 2016 22:04 IST