शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘एचएएल’ बंद पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:57 IST

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) २०२० पर्यंत बंद पडणार असल्याची खोटी माहिती एचएएलकडे कुठल्याही प्रकल्पाचे काम शिल्लक नसल्याच्या आधारावर पसरविली जात आहे; मात्र एचएएलमध्ये लवकरच हलक्या लढाऊ ‘तेजस’ नावाचे १२३ विमानांची निर्मिती सुरू होणार असल्याचा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देसुभाष भामरे : ‘तेजस’ नावाच्या १२३ लढाऊ विमानांची होणार निर्मिती

नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) २०२० पर्यंत बंद पडणार असल्याची खोटी माहिती एचएएलकडे कुठल्याही प्रकल्पाचे काम शिल्लक नसल्याच्या आधारावर पसरविली जात आहे; मात्र एचएएलमध्ये लवकरच हलक्या लढाऊ ‘तेजस’ नावाचे १२३ विमानांची निर्मिती सुरू होणार असल्याचा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.शहरात अग्र प्रेरणा अधिवेशनाच्या उद्घाटनानिमित्त भामरे रविवारी (दि.१८) आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले. एचएएलकडे काम शिल्लक नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात आहे. एचएएल बंद पडणार नाही, याची खात्री बाळगावी. कारण एचएएलच्या नाशिकसह देशातील सर्वच प्लांटमध्ये येणाऱ्या काळात १२३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीच्या कार्याला वेग येणार आहे.तब्बल एक लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प एचएएलला देण्यात आल्याची माहिती भामरे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, त्यामुळे २०२० नंतरही एचएएलमध्ये कामे सुरूच राहणार आहे.एचएएलला लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर निर्मितीचे मोठ्या कामाची आॅर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे एचएएल बंद पडणार असल्याच्या अफवांवर विश्वास दाखविणे चुकीचे ठरेल, असेही भामरे यांनी यावेळी स्पष्ट केले. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर निर्मितीचे कार्य नाशिकसह देशभरातील एचएएलच्या केंद्रांमध्ये होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.लवकरच १००० लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मितीभारतीय सैन्यदलासाठी एचएएल लवकरच १००० लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मितीचे महत्त्वाचे कार्य सुरू करणार आहे. सरकारच्या संरक्षण स्वदेशीकरणामध्ये एचएएलची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. १०० विमानांची निर्मितीदेखील भविष्यात एचएएल करणार आहे, त्यामुळे एचएएलकडे काम नाही किंवा काम राहणार नाही, या सगळ्या अफवा असल्याचे भामरे यांनी रोखठोकपणे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकDefenceसंरक्षण विभाग