आझादनगर : मालेगावहून हज यात्रेसाठी गेलेले जवळपास नऊशेहून अधिक नागरिक सुखरूप आहेत. गुरुवारी मक्केशेजारील मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ यात्रेकरुंचा मृत्यू व हजारो जण जखमी झाल्याचे वृत्त समजताच मालेगावी चिंतेचे सावट पसरले होते. हज यात्रेस गेलेल्या परिजनांची माहिती घेण्यासाठी दुपारनंतर अनेकजण दूरदर्शन संचासमोर बसले होते, तसेच मोबाइल फोनद्वारे परिजनांशी संपर्क साधून त्यांची ख्यालीखुशाली विचारली जात होती. (प्रतिनिधी)
मालेगावचे हज यात्रेकरू सुखरूप
By admin | Updated: September 25, 2015 23:49 IST