शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वणीलगत ४९ लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:15 IST

वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे जाणारा अवैध गुटखा व तंबाखु असा ४९ लाख रु पयांचा ऐवज स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्याने गुटखा तस्करामधे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देवाहनाच्या अग्रभागी असलेल्या काचेवर औषधै अत्यावश्यक सेवा असा उल्लेख

वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे जाणारा अवैध गुटखा व तंबाखु असा ४९ लाख रु पयांचा ऐवज स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्याने गुटखा तस्करामधे खळबळ उडाली आहे.याबाबतची प्राप्त माहीती अशी, गुजरातमधुन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात बेकायदेशीर गुटखा वाहतुक व विक्र ी करण्यात येत असल्याची माहीती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा लावण्यात आला. वणी दिंडोरी रस्त्यावरील संखेश्वर मंदीराजवळ एमएच १२- ४५७५ क्र मांकाचे आयशर वाहन या ठिकाणी आले असता पोलीसांनी त्याची तपासणी केली. या वाहनात १८० बॉक्समधे हा बेकायदा गुटख्याचा अवैध साठा आढळुन आला. गुजरात मधुन महाराष्ट्रात बेकायदा गुटखा वाहतुक व विक्र ी करण्यात येते याबाबत अनेकदा तक्रारी होत होत्या.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, रामभाऊ मुंढे, दीपक अहीरे, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, संजय गोसावी, अमोल घुगे, प्रविण सानप, रमेश काकडे, विकी म्हस्के, गणेश वराडे, वसंत खांडवी यांच्या पथकाने ही मोहीम पार पाडली.दरम्यान गुटखा वाहतुक करणाऱ्या या वाहनाच्या अग्रभागी असलेल्या काचेवर औषधै अत्यावश्यक सेवा असा उल्लेख असलेला कागद लावण्यात आला होता. वणी - सापुतारा रस्त्यावरु न गुटख्याचे वाहतुक करणारे वाहन दुपारच्या सुमारास आले तेव्हा सापुतारा चौफुलीवर वणी पोलीस ठाण्याचा केवळ एकच पोलीस कार्यरत होता. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे