शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याचा गुरुजनांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:22 IST

नाशिक : केवळ शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविणारे शिक्षक म्हणजे गुरु असतात असे नाही, तर जीवनाच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटत असतात. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा खूप मोठी आहे. आपल्या शिष्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते म्हणून ते वेळोेवेळी विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात, असे प्रतिपादन सूर्यादत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

ठळक मुद्देसंजय चोरडिया : लोकमतच्या वतीने शिक्षकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविणारे शिक्षक म्हणजे गुरु असतात असे नाही, तर जीवनाच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटत असतात. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा खूप मोठी आहे. आपल्या शिष्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते म्हणून ते वेळोेवेळी विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात, असे प्रतिपादन सूर्यादत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया यांनी केले.शिक्षक दिनानिमित्त ‘लोकमत’ आणि सूर्यादत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आॅनलाइन शिक्षक सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना डॉ. चोरडिया म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळे भावनिक नाते निर्माण झालेले असते.आपल्या विद्यार्थ्याने खूप मोठे व्हावे, समाजात नाव कमवावे यासाठी शिक्षक नेहमीच त्यांना आपल्याकडील अधिकाधिक चांगले ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी शिक्षकांनाही वेळोवेळी होणारे बदल स्वीकारावेलागतात. एका अर्थाने शिक्षक आयुष्यभर स्वत: शिकत असतात, अनेक बदल स्वीकारत असतात. आपल्याला आलेले अनुभव शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात. यातून भावी पिढी समृद्ध होत असते, असेही ते यावेळी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी केले. विद्यार्थी घडविण्यासाठी अनेक शिक्षक स्वत: कष्ट घेऊन स्वत:चे ज्ञान अद्ययावत करत असतात. अशा शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने ‘लोकमत’ने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे ते म्हणाले. यावेळी ई-प्रमाणपत्र देऊन ३४ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास विविध शाळांचे शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच महिन्यात तर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात बदल आत्मसात करून स्वत:ला अपडेट केले आहे. आजच्या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक शिक्षक आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. यामुळेच देशाची भावी पिढी आज सुरक्षित हातात आहे, असे गौरवोद्गारही डॉ. चोरडिया यांनी काढले.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनStudentविद्यार्थी