शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

गुरुपायी ठेविता भाव...शिक्षकांप्रति कृतज्ञता ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:00 IST

ंमालेगाव : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाभरात शिक्षकदिनी विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.केबीएच विद्यालय, मालेगाव कॅम्पयेथील कॅम्पातील केकेबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार, पर्यवेक्षक संतोष सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आॅनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील दोन विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकवण्यात आले. शिक्षिका श्रीमती पी. एच. वाघ यांनी विद्यालयास ग्रंथ भेट दिले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आर. डी. शेवाळे यांनी केले. आभार आर. एम. धनवट यांनी मानले.केबीएच विद्यालयमालेगाव : येथील केबीएच विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, पर्यवेक्षक विलास पगार, पर्यवेक्षक संतोष सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. आर. एम. धनवट जे. टी. ठाकरे, शशिकांत पवार, एस.के. सूर्यवंशी, ए.के. खेडकर, नितीन पवार, वामन शिंदे, जे. एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी, पांडुरंग शेलार उपस्थित होते.नेहरू विद्यालय, पाटणेमालेगाव : तालुक्यातील पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.टी. शेवाळे होते. प्रास्ताविक के.बी. धनेश्वर यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शेवाळे यांनी केले. यावेळी आर. एस. अहिरे, आर.पी. महाजन उपस्थित होते. आभार बी. एस. महाजन यांनी मानले.जनता विद्यालय, सौंदाणेपाटणे : मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा झाला. वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे, पर्यवेक्षक एस. डी. वाघ यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पवार यांनी प्रतिमापूजन केले. सूत्रसंचालन पी. यू. जाधव यांनीकेले.वैनतेय विद्यालयनिफाड : येथील वैनतेय विद्यालयात प्राचार्य डी. बी. वाघ व विद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डी.बी. वाघ, उपप्राचार्य एस.पी. गोरवे यांची भाषणे झाली. याप्रसंगी एस. पी. गोरवे, बी. आर. सोनवणे, सुभाष खाटेकर, आर. एम. लाहोटी, ए. बी. बनसोडे उपस्थित होते.आश्रमशाळा, पांडाणेपांडाणे : प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पांडाणे येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गिरीश पाटील यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमात ज्या ज्या शिक्षकांनी वाड्यावस्त्यावर जाऊन अनलॉक लर्निंग उपक्रमांतर्गत ज्ञानदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत, अशा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.ा्रास्ताविक वसंत देसले यांनी केले तर शरद शिवदे यांनी आभार मानले.गीताई वाघकन्या विद्यालयभाऊसाहेबनगर : येथील गीताई वाघ कन्या विद्यालय येथे आॅनलाइन शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जयश्री पानगव्हाणे होत्या. यावेळी साक्षी शिरसाठ, गौरी जाधव, जानकी सुरवाडे, स्नेहा हांडगे, समृद्धी सातभाई या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर पर्यवेक्षक धिवर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती दिली. रोशनी कडाळे हिने आभार मानले.एसपीएच विद्यालय, मालेगावमालेगाव : एसपीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्टÑपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष निकम होते. व्यासपीठावर पयर्वेक्षक एन.जे. निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील कोकणी यांनी केले. आभार सोपान पाटील यांनी मानले. एलव्हीएच विद्यालयमालेगाव : येथील एलव्हीएच विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पवार होते. त्यांच्या हस्ते राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पी. पी. राजपूत, मुख्याध्यापक पवार यांनी मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक एम. पी. शिंदे, प्रकाश कचवे, ज्ञानदेव हिरे, मगन शिरोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. सूर्यवंशी यांनी केले व आभार गिरीश पवार यांनी मानले.विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षकदिनजानोरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात कोरोनामुळे साध्या पद्धतीने व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षकदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राजकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, शंकर काठे, पोलीसपाटील सुरेश घुमरे, अशोक केंग, योगेश तिडके, संपत घुमरे, मुख्याध्यापक हडस व शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनSchoolशाळा