शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजनांनी साकारले स्वराज्य.... दुर्गजागृती : पेठ तालुक्यातील शिक्षकांनी साकारले गड-किल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 13:05 IST

रामदास शिंदे, पेठ बारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साधन. आपली चिमुकली या गुरूकुलात ज्ञानार्जन करतात म्हणजे सर्वासाठीच शाळा प्रियच म्हणून रस्त्यावरून जातांना नजरा नकळत शाळेकडे वळतात.

रामदास शिंदे, पेठबारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साधन. आपली चिमुकली या गुरूकुलात ज्ञानार्जन करतात म्हणजे सर्वासाठीच शाळा प्रियच म्हणून रस्त्यावरून जातांना नजरा नकळत शाळेकडे वळतात.लगबगीने शेतावर जाणाºया येणाºयांच्या नजरा शाळेकडे गेल्या आणी अचानक स्थिरावल्याही. नेहमीप्रमाणे शाळकरी पाखरांची किलिबल आज जाणवत नव्हती. त्याऐवजी शाळेचे क्रि डांगण वेगळ्याच धावपळीत गुंतले होते. जिकडे तिकडे टिकाव फावडयांचा निनाद, दगड, विटा, माती, खडी, लाकूड, पुठ्ठा आणी मिळेल त्या वस्तूची नुसती देणघेण. कोणाचा रायगड रु प घेतोय तर कोणाचा शिवनेरी.एकीकडे प्रतापगडाचा रु बाब तर दुसरीकडे कोंडाण्याची शान.निमित्त होते पेठ तालुक्यातील जोगमोडी बीटअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षण परिषदेचे. एरवी शिक्षकांच्या प्रशिक्षण व कार्यशाळामध्ये केवळ प्रशासकिय परिपत्रके, सुचना व वरिष्ठांच्या आदेशाचा बडीमर असतांना बारवपाडा येथील शिक्षण परिषदेत विस्तार अधिकारी सुनिता जाधव यांच्या संकल्पनेतून शिक्षकांसाठी किल्ले निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.आपल्या दैनंदिन अध्यापनात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास शिकवत असतांना या स्वराज्याचे भूषण असणाºया प्रमुख दहा किल्लांची प्रतिकृती साकार करण्याची संधी गुरु जनांना मिळाली.आपल्या मनातील कल्पनांना व सुप्त गुणांना वाव देत शिक्षकांनी गडिकल्यांच्या शाश्वत प्रतिकृती साकारल्या. दरवाजे, महादरवाजे,माची, बुरु ज, तटबंधी, कोठार, चोरवाटा यासह गडावरील बारीकसारीक बाबी हुबेहुब दाखवण्याचा शिक्षकांचा ज्ञानरचनावाद साकारला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध साहित्याचा वापर करून जीव ओतून साकारलेल्या गडावर भगवा फडकवतांना प्रत्येकाची छाती भरून आली. शाळेच्या परिसरात जणू काही स्वराज्य अवतरल्याचे जाणवत होते.

टॅग्स :Nashikनाशिक