शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

धान्य गुदामातील घुशी !

By किरण अग्रवाल | Updated: December 2, 2018 00:35 IST

नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यातील संशयितांची संख्या तब्बल ८४वर पोहचल्याने आणि त्यात पुन्हा काही तहसीलदारांसारख्या उच्च पदस्थांची भर पडल्याने, गुदामातील अन्न-धान्याचा तेथील उंदीर अगर घुशींनीच नव्हे तर द्विपादांनीही फडशा पाडल्याचे स्पष्ट व्हावे.

ठळक मुद्देसंगणकीकृत ‘पॉस’ यंत्रणा कार्यान्वित झाल्याने गडबडीला अटकाव झाला आहे.सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणातून सरकारी यंत्रणेतील झारीतले शुक्राचार्य उघड होऊन गेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यातील संशयितांची संख्या तब्बल ८४वर पोहचल्याने आणि त्यात पुन्हा काही तहसीलदारांसारख्या उच्च पदस्थांची भर पडल्याने, गुदामातील अन्न-धान्याचा तेथील उंदीर अगर घुशींनीच नव्हे तर द्विपादांनीही फडशा पाडल्याचे स्पष्ट व्हावे.रेशन दुकानाद्वारे केल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य पुरवठ्यातील सावळा गोंधळ आजवर कायम टीकास्पद ठरत आला आहे. आता या पुरवठा प्रणालीला पारदर्शक करण्यासाठी संगणकीकृत ‘पॉस’ यंत्रणा कार्यान्वित झाल्याने गडबडीला अटकाव झाला आहे; पण पूर्वी रेशनच्या धान्याची काळ्याबाजारात सर्रासपणे विक्री चालायची. हे रॅकेट केवळ दुकानदारांच्याच पातळीवर होते अशातला भाग नाही, तर ते अन्न महामंडळाच्या गुदामातून निघतानाच कसे खुल्या बाजारापर्यंत पोहोचत असे याचा भंडाफोड सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणातून झाला. यात दुकानदार, ठेकेदार, वाहतूकदार व अगदी अधिकारीदेखील सहभागी राहिल्याचे या प्रकरणातून पुढे आले, त्यावर विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली जाऊन पुरवठा अधिकाºयासह ७ तहसीलदार निलंबित केले गेल्याने संपूर्ण राज्यातीलच पुरवठा यंत्रणा खडबडून जागी झाली. याच प्रकरणात आता पाच तहसीलदारांसह ४९ संशयितांची नव्याने भर पडल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढून गेली आहे. तीन वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात वर्ग एकच्या दर्जाचे अधिकारी अडकल्याचे पाहता सरकारी यंत्रणेतील झारीतले शुक्राचार्य उघड होऊन गेले आहे. या दीर्घ कालावधीत आता पुन्हा काही तहसीलदारांसह अन्य अधिकाºयांची संशयित म्हणून भर पडल्याने पुरवठा खात्यात किती दलदल होती हेच अधोरेखित व्हावे. अर्थात, कोणत्याही प्रकरणातली संशयितांची संख्या वाढते तेव्हा आरोप सिद्ध करणे कठीण होऊन बसते. प्रस्तुत प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडे सोपविलेला असल्याने काटेकोरपणे त्याचा तपास सुरू आहे खरा, तथापि तो तडीस जावा इतकेच यानिमित्त.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारfoodअन्न