शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी नगरसेवकावर रोखली बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:43 IST

मालेगाव शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मालेगाव मध्य : शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पवारवाडी पोलिसांत मो. आमीन मो. फारूख यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नगरसेवक मो. आमीन मो. फारूख शुक्रवारी दुपारी नमाजपठण करून घरी परतले. लहान मुलांना फळे घेण्यासाठी मुशावरत चौकात गेले होते. असता त्यांचा भाऊ मोहंमद यासीन याने त्यांना फोन करून घरापासून अमन हॉस्पिटलपर्यंत अज्ञात इसम बंदूक घेऊन येत असल्याची माहिती दिली.याप्रकरणी मो. फारूख यांनी मित्र नगरसेवक मोहंमद तन्वीर, मोहंमद मोबीन व पवारवाडी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार मित्र व पवारवाडीचे हवालदार सचिन धारणकर, नवनाथ शेलार यांच्यासह घराजवळ पोहोचले त्यांच्या घरासमोर तोंडावर रुमाल बांधलेला अज्ञात इसम उभा होता. मो. आमीन यांच्या सोबत पोलीस पाहताच त्याने जवळ असलेले पिस्तुुलाने मो. अमीन यांना धाक दाखवला. यामुळे घाबरून अमीन घरासमोरील झाडांमध्ये पळाले, तर पोलिसांनी शेजारील गल्लीचा आश्रय घेतला. यानंतर ताज हॉटेल ते नूरबागपर्यंत पोलिसांनी संशयित इसमाचा पाठलाग केला. काही वेळातच पोलीस निरीक्षक पाटील नूरबाग चौकात पोहोचले. त्यांनी संशयित आरोपीचा शोध घेतला; मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक एजाज बेग, नबी अहमद, मुस्तकीम डिग्निटी यांच्यासह महागठबंधनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी संशयित आरोपीस त्वरित अटक करून घटनेची चौकशी करावी, अशी मागणी उपस्थितांनी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्याकडे केली. संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. त्यास लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. याबाबत सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाजीम शेख करीत आहेत. 

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी