नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना पोलीस निरीक्षक अनिल भवारी. समवेत विजय चोपडा, प्राचार्य मॅथ्यू, मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे, पंकज देवकाते, संदीप जेजूरकर.नांदगाव : येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मीडिअम स्कूल व कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नांदगाव पोलीस स्टेशनतर्फे आयोजित बालहक्क संरक्षण सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी बालहक्क संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना बालमजुरी, बालविवाह, बाल गुन्हेगारी, बालकांवर होणारे अत्याचार आदी बाबींवर माहिती सांगून यापासून संरक्षण कसे करायचे ह्या विषयी मार्गदर्शन केले. यासंदर्भात असलेल्या कायद्याची माहिती देऊन पोलीस मित्र असल्याचे पटवून दिले. आवश्यक असेल त्यावेळी पोलीसांची मदत घ्या व बालगुन्हेगारी, बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मदत करा, असे आवाहन भवारी यांनी केले.याप्रसंगी संस्थेचे सचिव विजय चोपडा, प्राचार्य मॅथ्यू, मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज देवकते, संदीप जेजूरकर आदींसह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी केले. मॅथ्यू यांनी आभार मानले.
बालहक्कांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 19:10 IST