शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पानी फाउण्डेशनच्या कामाबाबत पालक सचिवांनी केले समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:50 IST

सिन्नर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौºयावर आलेले पालक सचिव सीताराम कुंटे यांनी टेंभूरवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाउण्डेशनच्या कामाला भेट देत समाधान व्यक्त केले.

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौºयावर आलेले पालक सचिव सीताराम कुंटे यांनी टेंभूरवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाउण्डेशनच्या कामाला भेट देत समाधान व्यक्त केले.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टेंभूरवाडी (आशापूर) गावाने यंदाच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला असून, सकाळी व संध्याकाळी गावातील सर्व महिला नियमितपणे दोन तास श्रमदान करतात, अशी माहिती पालक सचिवांना देण्यात आली होती. तालुक्यात पानी फाउण्डेशनच्या एखाद्या कामावर भेट देण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर टेंभूरवाडी येथील कामावर भेट देण्याचा निर्णय झाला. सचिवांचा ताफा टेंभूरवाडी पोहोचल्यानंतर श्रमदान सुरू असलेल्या धनगरी बंधारा तळ्याच्या परिसरात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने पायपीट करावी लागणार होती. आपल्या वाहनातून उतरून पालक सचिव कुंटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांचा लवाजमा पायी निघाला. सरपंच विष्णू पाटोळे, संगीता पाटोळे यांनी पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून गावाने वॉटरकप स्पर्धेसाठी घेतलेल्या पुढाकाराची व लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. गावाचा परिवार जलयुक्त बनवण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून लोक एकत्र येत असून, त्यात महिलांचा असणारा पुढाकार वाखाणण्याजोगा असल्याचे कुंटे यावेळी म्हणाले. टेंभूरवाडी येथील सुरू असलेल्या कामांबद्दल कौतुक त्यांनी ग्रामस्थांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.वॉटरकपसाठी टेंभूरवाडी गावाने सहभाग नोंदवला असून, गावाच्या परिसरात प्रभावीपणे जलउपचार करण्यात येत आहेत. दि. ८ एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरु वात झाली आहे. कम्पार्टमेंट बंडिंग, माती बांध, दगडी बांध, तलावातील गाळ काढणे, समतल चर खोदणे आदी कामे श्रमदानाच्या माध्यमातून सुरू आहेत. ग्रामस्थ पहाटे व सायंकाळी श्रमदान करतात. गेल्या दोन आठवड्यांपासून गावातील बचतगटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या असून, त्या नियमितपणे श्रमदानात सहभागी होत आहेत. या महिला दररोज दोन तास श्रमदान करीत आहेत. वॉटरकपसाठी गाव एकत्र आले असून, मूल्यांकन तालिका ५० गुणांवर पोहचली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा