शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाढते अपार्टमेंट झाडांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:55 IST

शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे.

इंदिरानगर : शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे. ही कत्तल होत असताना नियमावलीप्रमाणे प्रत्येक अपार्टमेंटच्या जागेत पाच झाडे लावण्याची सक्ती करण्यात आल्यानंतरही त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सीमेंटच्या जंगलात वातावरण चांगले तापू लागले आहे. काही अपार्टमेंटमध्ये केवळ शोभेची झाडे लावून नियम पाळले जात असल्याचा देखावा केला जात असून, त्यामुळे मूळ उद्देशाला खो बसत आहेइंदिरानगरसह परिसरात बंगल्यांच्या जागी नवनवीन अपार्टमेंट आणि जुन्या अपार्टमेंट नूतनीकरणामुळे वृक्षांवर कुºहाडी मारल्या जात आहेत. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरणावर परिणाम होत आहे. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीचे टुमदार बंगले आणि जमिनीवर उभ्या राहणाºया नव्या सोसायट्यांमुळे हा प्रकार सुरू झाला आहे. यामध्ये बंगल्याच्या परिसरात त्याकाळी लावलेल्या जुन्या विविध वृक्षांवर कुºहाड मारली जात असून, वाढती लोकसंख्या व जागेच्या कमतरतेमुळे उपनगरमधील प्रत्येक जुन्या वसाहतीत तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या जुन्या अपार्टमेंटला नूतनीकरण करण्याचे वेध लागले आहेत. बंगल्याच्या ठिकाणी आकर्षक आणि वेगवेगळ्या सुविधा असलेल्या अपार्टमेंट उभारल्या जातात त्यामुळे सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची जुनी घरे, बंगले नवीन अपार्टमेंटपुढे फिके पडत चालेले आहेत.  अशातच जुन्या अपार्टमेंट देखभालीचा खर्च वाढल्याने शहर परिसरात बंगल्याच्या जागी अपार्टमेंट आणि जुन्या अपार्टमेंटचे नूतनीकरण असा धडाका सुरू झाला आहे. परंतु हे करीत असताना महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन करीत सर्रासपणे वृक्षांवर कुºहाड मारली जात आहे. त्यामुळे वृक्षांच्या घटत्या संख्येने पर्यावरणावर परिणाम होत आहे.शहरात कोणत्याही इमारतीचा प्लॅन मंजूर करताना नगररचना विभागाच्या वतीने बांधकाम व्यावसायिकाकडून आगाऊ अनामत रक्कम स्वीकारली जाते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना किमान पाच झाडे लावण्यात आल्याचा पुरावा संबंधित विभागाला सादर केल्यानंतर ती अनामत रक्कम परत मिळते. यासाठी नगररचना विभागाच्या कर्मचाºयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री करणे आवश्यक असते. बांधकाम व्यावसायिकाने झाडांची लागवड केली नसेल तर आधी भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. आजपर्यंतचा नगररचना विभागाच्या कारभारातील नोंदी पाहिल्या तर बहुसंख्य नोंदणी केलेल्या विकासकांनी त्यांच्या इमारतीच्या आवारात वृक्षांची लागवड फक्त कागदोपत्रीच केलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यापलीकडे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुळात अशा बांधकाम करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, अशी सूचनाही या नियमात आहे. परंतु त्याकडे डोळेझाक केली जात असल्याने अनामत रक्कम जप्त होण्यापलीकडे काहीच कारवाई होत नसल्याने बांधकाम करणारेही निर्धास्त झाले आहेत.शोभिवंत वृक्षांचा मोह टाळावाविकास साधताना पर्यावरणपूरक प्रजातीच्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांच्या मुळावर घाव घातले जात आहेत. वृक्षतोड केल्यानंतर शहर व परिसरात पर्यावरणपूरकच वृक्षाच्या जातीची रोपे लावण्याची गरज आहे. वड, पिंपळ, कडुनिंब, बाभूळ, चिंच, आंबा यांसारख्या भारतीय जातीच्या रोपांची लागवड केल्यास पर्यावरणाचे खºया अर्थाने संवर्धन होऊन पक्ष्यांना निवारा व खाद्य उपलब्ध होण्यास मदतच होईल. त्यामुळे सोसायट्यांनी वृक्षारोपण करताना शोभेच्या झाडांचा मोह टाळण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल