शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जोरणच्या गटारी झाल्या भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:41 IST

दखल : ग्रामपंचायतीने सांडपाण काढले गावाबाहेर

ठळक मुद्देलोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील गटारींची पाहणी केली

जोरण - बागलाण तालुक्यातील जोरण येथील गावातील सांडपाणी हे गेल्या अनेक वर्षापासुन गटारींची कामे केली नसल्याने ती एक मोठी समस्या बनली होती. ‘लोकमत’ने गावातील समस्याचा फेरा याबाबतचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर ग्रामपंचायतीने उघड्या गटारी भूमिगत करत सांडपाणी गावाबाहेर काढले आहे.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील गटारींची पाहणी केली व सांडपाण्याच्या निच-यासंबंधी नियोजन करण्यात आले. त्यानुसार गावातील सांडपाणी हे बंदिस्त गटारींचे काम करु न गावाबाहेर काढण्यात आले. गावातील काही भागातील गटारी व रस्ते सारखे झाले होते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत डबकी साचत होती. या दुषीत पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत होते. मात्र आता भुमिगत गटारी करु न ठिकठिकाणी चेंबर उभारण्यात आले असून सांडपाणी गावाबाहेर काढण्यात आले आहे. आता पावसाळ्यात कोणत्याच भागात डबकी साचणार नाहीत यानुसार गटारींची कामे करण्यात आली आहेत.गटारींची कामे मार्गीगावातील नागरिकांच्या अनेक वेळा तक्र ारी आल्या होत्या.मात्र निधी अभावी काम करता येत नव्हते. लोकमतने सदर प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून दिल्यानंतर आम्हाला दुसरा निधी वर्ग करु न गावातील सांडपाणी गटारींची कामे त्वरीत करावी लागली. या विषयी ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने बैठक घेवून बंद गटारींची कामे मार्गी लावण्यात आली. उर्वरित कामही तातडीने करण्यात येईल.- धीरज कापडणीस, ग्रामसेवक , जोरण.

टॅग्स :Nashikनाशिक