संजय देवरे : देवळाजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जि.प. लोहोणेर गटात भाजपाच्या धनश्री अहेर यांनी बाजी मारल्याने भाजपाने ही जागा राखली आहे, तर वाखारी व उमराणा गटात अनुक्र मे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन अहेर व यशवंत शिरसाठ यांनी विजय मिळवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जागा राखण्यात यश मिळाले आहे. पंचायत समिती गणातील सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा मिळवल्याने गत निवडणुकीच्या तुलनेत एका जागेची वाढ झाली आहे. भाजपा दोन, व शिवसेनेने १ जागा मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. पंचायत समितीचे सभापतीपद अनु.जाती मिहलेसाठी आरिक्षत झाले आहे.तालुक्यात पंचायत समतिीच्या सहा गणात अनु.जाती महीलेची जागा नसल्यामुळे खर्डा गणातुन अनु.जाती पुरु ष ह्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे निवडणुकीत विजयी झालेल्या केसरबाई सुकदेव अहीरे ह्या महीलेला सभापती पद मिळणार हे निश्चित झाल्याने पंचायत समतिीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे. संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागुन राहीलेल्या लोहणेर गटात जि.प.कृषी सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर (भाजपा)यांनी बाजारसमतिीचे माजी सभापती योगेश अहेर यांच्या पत्नी लीना अहेर(रा.काँ.) यांचा 5 हजार 929 मतांनी पराभव केला आहे.वर्षभरापुर्वी देवळा नगरपंचायत निवडणुकीत केदा अहेर व योगेश अहेर यांनी विकासाला प्राधान्य देत राजकीय जोडे बाजुला ठेवत एकित्रतपणे नगरपंचायत निवडणुक लढवत नगरपंचायतीची सत्ता प्राप्त केली होती.ह्या जिल्हापरीषद निवडणुकीत योगेश अहेर यांच्या पत्नी लीना अहेर ह्या वाखारी गटातुन रा.काँ.तर्फे निवडणुक लढविण्यासाठी उत्सुक होत्या.तसा वाखारी गटात त्यांनी प्रचारास सुरु वातही केली होती.अखेरच्या क्षणी त्यांना पक्षाच्या आग्रहाखातर लोहणेर गटात उमेदवारी करावी लागली तेव्हाच त्यांचे विजयाचे गणति बसवणे अवघड असल्याचे दिसत होते.कारण ह्या गटावर असलेला भाजपाच्या केदा अहेर यांचा प्रभाव. गत निवडणुकीत लोहणेर गटातुन केदा अहेर यांच्या विरोधात निवडणुक लढलेले पंकज निकम यावेळी महालपाटणे गणात,तर कल्पना देशमुख ह्या लोहणेर गणात भाजपातर्फे केदा अहेर यांच्यासोबत निवडणुक लढवित होते. लीना अहेर यांना लोहणेर गटात निवडणुक लढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.ह्या गटात एकतर्फी निवडणुक झाली.गटात व गणात भाजपाने वर्चस्व राखले.जिल्हापरीषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण मिहलेसाठी राखीव आहे.केदा अहेर यांचा जिल्ह्यातील राजकारणावर असलेला प्रभाव व सुरु असलेल्या घडामोडी पाहता धनश्री अहेर यांना नासिक जिल्हापरीषदेच्या अध्यक्षपदाचे दावेदार मानले जाउ लागले आहे.ह्या निवडणुकीनंतर केदा अहेर व योगेश अहेर यांच्यातील मैत्रीचे संबंध यापुढे कायम राहतील का?अशी चर्चा सुरु झाली आहे. उमराणे गटात रा.काँ.चे यशवंतराव शिरसाठ यांनी भाजपाचे सोमनाथ पवार यांचा 1672 मतांनी पराभव केला.उमराणे गणात रा.काँ.चे धर्मा देवरे विजयी झाले.दहीवड गणात मात्र शिवसेनेने बाजी मारली.सेनेच्या सरला जाधव ह्या गणात विजयी झाल्या.कामांमुळे यशवाखारी व उमराणे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. वाखारी गटात नूतन सुनील अहेर यांनी जिल्हापरीषदेच्या माजी सदस्य भाजपाच्या भारती अशोक अहेर यांचा 5182 मतांनी पराभव केला.प्रथमच निवडणुक लढवित असलेल्या नूतन अहेर यांनी सहा महिन्यांपूर्वीच निवडणूक लढविण्याची तयारी करत वाखारी गटात प्रचारात आघाडी घेतली होती.वाखारी गटात नुतन अहेर व लीना अहेर यांच्यात रा.काँ.च्या तिकीटासाठी चुरस होती.परंतु निवडणुक लढविण्यासाठी नुतन अहेर यांनी केलेले नियोजन,गटातील प्रत्येक गाव पिंजुन काढत साधलेला जनसंपर्क,व महीला आयोगाच्या माध्यमातुन केलेली कामे ह्या गोष्टींचा त्यांना लाभ झाला.यामुळे लीना अहेर यांना आयत्यावेळी लोहणेर गटातुन उमेदवारी करावी लागली.
गड राखला !
By admin | Updated: February 25, 2017 00:21 IST