शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुरीसाठी पोते शिलाई यंत्राचा खर्च खरेदी संघाच्या माथी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 15:10 IST

यंदा शासनाने आधारभुत किंमतीत तुर खरेदी करतांना मक्याप्रमाणे तुर खरेदीसाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तुर खरेदी करण्याबरोबरच खरेदी केलेल्या तुरीचे पोते सुतळीने शिवण्याऐवजी पोते शिलाई यंत्राच्या सहाय्याने

ठळक मुद्देनकार : तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात अडचणी तुरीचे पोते सुतळीऐवजी यंत्राच्या सहाय्याने शिवण्याचा निर्णय

नाशिक : खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणा-या तुरीचे पोते सुतळीऐवजी यंत्राच्या सहाय्याने शिवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन पोते शिलाई यंत्र खरेदीचा खर्च तालुका खरेदी-विक्री संघाच्या माथी मारल्यामुळे अगोदरच सरकारकडून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले येणे मिळत नसल्याने त्यात यंत्र खरेदीचा खर्च उचलण्यास संघांनी नकार दिला आहे, परिणामी जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून सुरू होणारे आधारभुत किंमतीचे तुर खरेदी केंद्रे सुरू होण्याचा मुहूर्त टळला आहे.यंदा शासनाने आधारभुत किंमतीत तुर खरेदी करतांना मक्याप्रमाणे तुर खरेदीसाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तुर खरेदी करण्याबरोबरच खरेदी केलेल्या तुरीचे पोते सुतळीने शिवण्याऐवजी पोते शिलाई यंत्राच्या सहाय्याने पोते शिवून, त्यावर तुरीची प्रत, विक्री करणा-या शेतक-याचे ओळखपत्र आदी माहितीची चिठ्ठी लावण्याचे ठरविले आहे. ही सारी कामे खरेदी-विक्री संघाने करायची आहेत. त्यामोबदल्यात खरेदी-विक्री संघाला काहीच मिळणार नाही. मुळात गेल्या वर्षी खरेदी-विक्री संघाने तुर खरेदी केली असता, त्याचे कमिशनही अद्याप शासनाने दिले नाही, उलट हमाली मिळविण्यासाठी खरेदी-विक्री संंघांना शासनाच्या दरबारी खेटा घालाव्या लागल्या होत्या. त्यामुळे आता तुर खरेदीसाठी शिलाई यंत्र खरेदी करण्याचा खर्च उचलण्यास संघांनी नकार दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दहा-बारा पोते शिवण्यासाठी यंत्र घेणे परवडत नसून, शासनाने त्याचा खर्च द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक