शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

हिमालयाचा प्रहरी गमावल्याची खंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:13 IST

ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने  जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. नाशिकला दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने ते येऊन गेल्याने त्यांच्या विचारांनीदेखील नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते. 

ठळक मुद्देअभिवादन : नाशिककरांनी जागवल्या बहुगुणा यांच्या स्मृती

नाशिक : ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने  जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. नाशिकला दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने ते येऊन गेल्याने त्यांच्या विचारांनीदेखील नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते. बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाने ऐंशीच्या दशकात संपूर्ण देशातील पर्यावरणवाद्यांना बळ मिळाले होते. पर्यावरणाचे आंदोलन योग्य कारणासाठी असेल आणि तेदेखील आक्रमकतेने केले तर केंद्र आणि राज्यांचे शासनदेखील झुकू शकते, हे त्यांच्या आंदोलनांनी दाखवून दिले होते. नाशिकमध्ये कैलास मठात त्यांना १९९८ साली सरस्वती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच त्यानंतर २००४ या वर्षीदेखील त्यांचे नाशिकला एका कार्यक्रमानिमित्ताने आगमन झाल्याने त्यांचे विचार ऐकण्याची संधीदेखील लाभली होती. कैलास मठातील सरस्वती पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी प्रथम संबंध आला. त्यानंतर दर तीन-चार वर्षांनी ते नाशिकला आले किंवा मी हिमालयात गेलो की त्यांची भेट व्हायची. या धरतीशी आणि हिमालयाशी नातं असलेले ते एक महान व्यक्तिमत्त्व होते. आपल्या तत्त्वांशी अत्यंत प्रामाणिक असलेला मोठा सामाजिक कार्यकर्ता आणि मार्गदर्शक गमावल्याचे दु;ख आहे. - स्वामी संविदानंद सरस्वती, कैलास मठनाशिकला कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांची भेट झाली होती. आपला समाज उपभोगवादापासून दूर गेला नाही, तर निसर्गाचा विनाश अटळ असल्याचे त्यांचे शब्द अजूनही स्मरणात आहेत. प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या गरजा कमीत कमी करायला हव्यात, हा त्यांचा विचार आजही अनुकरणीय आहे. पर्यावरणासाठी झटणारा अत्यंत मोठा सामाजिक कार्यकर्ता गमावल्याचे दु:ख असून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. - दिगंबर गाडगीळ, ज्येष्ठ पक्षिमित्र

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक