वसंतराव नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदापासून सुरु वात करून महाराष्ट्राच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कार्य करता आले. त्यांनी प्रशासकीय शिस्तबद्धता, सामाजिक, राजकीय तसेच शेतीविषयक केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची आम्हांस नेहमी प्रेरणा मिळते असे प्रतिपादन नगराध्यक्ष किरण डगळे यांनी केले. येथील नगरपरिषद कार्यालयात हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोखंडे, दुर्वास यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक पंकज मोरे, रूपेश मुठे, मल्लू पाबळे, मालती भोळे, तसेच नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सुरेश गवांदे, कर निरीक्षक नितीन परदेशी, लेखापाल विष्णू हाडके, सहा.लेखापाल भीमराव संसारे, स्वच्छता निरिक्षक रविंद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:13 IST