एकलहरेः लाखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे होते.यावेळी मालपुरे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका विजया पगार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे लाखलगाव भजनी मंडळातील ज्येष्ठ नागरिक निवृत्ती जाधव यांनी आपल्या मनोगतात गाडगेबाबा लाखलगावात दोनदा आल्याचा उल्लेख केला. यावेळी विजया पगार, नीता कदम, सुचित्रा देवरे, विजय जगताप, शीतल पगार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जगताप यांनी केले तर आभार शीतल पगार यांनी मानले.
लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:07 IST