पंचवटी : पेठ फाटा येथे पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमात पंचवटी मंडल अध्यक्ष दिगंबर धुमाळ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष संजय गालफाडे यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत अंतिम माणसाच्या उदयाची म्हणजेच अंत्योदयची संकल्पना पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. जोपर्यंत शेवटच्या घटकाचा विकास होणार नाही तोपर्यंत राष्ट्राचा विकास होणार नाही ही संकल्पना सर्वांत प्रथम पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली, असे गालफाडे यांनी पुढे सांगितले. त्यामुळे केंद्र तसेच राज्य शासनाच्या मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजना मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपेक्षित घटकांपर्यंत नेऊन या योजनेचा लाभ त्यांना कसा मिळेल यासाठी काम करावे, असेही आवाहन केले. यावेळी सूत्रसंचालन अमित घुगे यांनी तर आभार विजय चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी धनंजय पुजारी, सोमनाथ बोडके, लक्ष्मण धोत्रे, विजय पगार, बापू सपकाळे, बापू लोखंडे, सुनील कापसे, संतोष लासूरे, सुनील फरताळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने त्यांना अभिवादन करताना संजय गालफाडे, दिगंबर धुमाळ, अमित घुगे, विजय चव्हाण, धनंजय पुजारी, सोमनाथ बोडके, लक्ष्मण धोत्रे, विजय पगार, संतोष लासूरे, सुनील फरताळे आदि.
दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
By admin | Updated: September 27, 2016 01:25 IST