नाशिक : फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक व बहुद्देशीय संस्था वैद्यनगर हॅपी होम कॉलनी शाखा यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी पाली भाषेचे अभ्यासक अतुल भोसेकर यांनी विचार मांडले. जगात अनेक देशांत पुरातत्त्व विभागाकडून खोदकाम करण्यात आले. त्यात बौद्ध धम्माचेच लिखित स्वरूपातील पुरावे सापडले आहेत. मानवजातीच्या शांततामय कल्याणासाठी वैज्ञानिक दृष्टीवर आधारलेल्या धम्माची जगाला गरज आहे, असेही ते म्हणाले.कार्यक्रमात संस्थेचे आनंद तेजाळे, विद्युल्लता जाधव, लता तेजाळे, नेहा पगारे, संगीता काळे, शोभा पगारे, रेखा साळवे, सागर तेजाळे, सचिन काळे, राजेंद्र सोनवणे, भरत हिवाळे, विजय अहिरेे आदि उपस्थित होते.
फुले-शाहू-आंबेडकर संस्थेच्या वतीने अभिवादन
By admin | Updated: May 17, 2014 00:15 IST