शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दिंडोरीत वृक्षलागवडीने पसरली हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:39 IST

लखमापूर : शासनाच्या ह्यझाडे लावा आणि झाडे जगवाह्ण ही संकल्पना राबवत असताना फक्त कागदी घोडे मिरवण्यात धन्यता मानत दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावताना आपण बघतो; परंतु योग्य नियोजन करून झाडे लावणेच नाही तर त्याचे संगोपन करून दाखवत गावात सर्वत्र हिरवळ करून दाखवणारे दिंडोरी तालुक्यात आदर्श संकल्पना राबवणारे गाव म्हणजे जऊळके-दिंडोरी होय.

ठळक मुद्देजऊळके ग्रामपंचायतीने राबवला आदर्श उपक्रम

लखमापूर : शासनाच्या ह्यझाडे लावा आणि झाडे जगवाह्ण ही संकल्पना राबवत असताना फक्त कागदी घोडे मिरवण्यात धन्यता मानत दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावताना आपण बघतो; परंतु योग्य नियोजन करून झाडे लावणेच नाही तर त्याचे संगोपन करून दाखवत गावात सर्वत्र हिरवळ करून दाखवणारे दिंडोरी तालुक्यात आदर्श संकल्पना राबवणारे गाव म्हणजे जऊळके-दिंडोरी होय.जऊळके-दिंडोरी येथील तुकाराम जोंधळे यांच्या संकल्पनेतून गावातील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. त्या झाडांना व्यवस्थित संरक्षक जाळी लावत ड्रिपद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली. साधारण सहा किलोमीटर अंतराचे ड्रिप करून झाडांचे संवर्धन करण्यात जऊळके-दिंडोरी गावाला यश आले आहे.जवळपास ३ हजार झाडे लावून त्यांची योग्य नीगा राखत संगोपन केल्यामुळे गावात दुतर्फा सर्वत्र हिरवळ दिसून येत आहे. यात देशीआंबा ५०० , जांभुळ ४००, फणस ५०, बहावा १००, पिंपळ ५०, वड ५०, मोहगणी ५०, फलकस १५०, उंबर २५, मोह ५०, कंदक ५० , अशोक १००, कांचन १५०, कंबोडिया ५०, नारळ १०, शिक्षण १००, टिकोमा २००, चेरी २०, बदाम २०, बांबू ५०, बोगनपेल १००, टबोबिया मेल्को ३००, कडुनिंब १०० आदी झाडे लावत त्यांचे योग्य संगोपन केल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे.ग्रामस्थांनीदेखील वृक्षप्रेम दर्शवत योग्य ते सहकार्य करून यात आपलेही योगदान दिले आहे. शासनाच्‍या झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला साथ देत जऊळके-दिंडोरी गावाने जिल्ह्यात एक आदर्श उपक्रम राबवत वृक्षाबद्दल प्रेम असेल आणि त्याचे योग्य काळजी घेतली तर वृक्षांचे कसे संगोपन करता येईल याचे योग्य ते उदाहरण दाखवून दिले आहे. ही संकल्पना पाहण्यासाठी परिसरातील गावकरी भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत.झाड लावल्यानंतर त्याचे संगोपन करणे ही खरी जबाबदारी आहे. वृक्ष लागवड ही संकल्पना मनात होतीच; परंतु लोकांना सांगण्यापेक्षा ती आपल्यापासून सुरुवात करावी या विचारातून आम्ही पाच-सहा वर्षांपासून झाडे लावली असून त्याचे योग्य संगोपन केल्याने आज ती झाडे मोठी झाली आहेत. गावचे एक आकर्षण वाढले आहे. यात वेगळेच समाधान लाभत आहे. इतर गावांनीही याप्रकारे वृक्ष लागवड करून संगोपन करावे.- भारती जोंधळे, सरपंच, जऊळके-दिंडोरी.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासgram panchayatग्राम पंचायत