शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हरित लवादाने याचिका फेटाळली

By admin | Updated: May 29, 2014 00:20 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेली याचिका लवादाने फेटाळून लावली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेली याचिका लवादाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे पर्यावरण रक्षण कार्यकर्त्यांना धक्का बसला असून, याप्रकरणी त्यांच्याकडून या विरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धा करण्यात आला. नाशिक मनपाने रस्ता रुंदीकरण तसेच इतर काही कारणांस्तव शहरातील सुमारे साडेतीनशेहून अधिक झाडांची कत्तल केल्याचा आरोप करीत वृक्षमित्र ऋषिकेश नाझरे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. महापालिका अनावश्यक झाडे तोडत असून वृक्षांची जोपर्यंत गणना होत नाही तोपर्यंत झाडे तोडू नयेत. हरित न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय झाडे तोडली जाऊ नयेत, याबरोबरच महापालिकेची वृक्षप्राधिकरण समिती बरखास्त करावी. समिती निसर्ग रक्षणाचे कोणतेही काम करीत नाही, त्यांना त्याबाबत ज्ञान नसल्यामुळे ही समितीच रद्द करण्यात यावी, अशी याचिका दाखल केली होती. त्यानुसार हरित प्राधिकरणाने वृक्षप्राधिकरण समितीच्या पंधरा सदस्यांना नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्याची परवानगी दिली होती. याप्रकरणी लवदासमोर झालेल्या चर्चेनंतर नाझरे यांची याचिका फेटाळण्यात आली. सन २००६ मध्ये अशाच प्रकारची आणि मागण्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर सुनावणी होऊन त्याबाबतच्या काही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नव्याने लवादाने यावर निर्णय घ्यावा हे उचित नसून नाझरे यांनी संबंधित संस्थेकडील माहिती घेऊन महापालिकेकडे मुद्दे मांडावेत, असा निकाल देण्यात आला. याबरोबरच वृक्षप्राधिकरण समिती बेकायदेशीर तसेच नियमाबा‘ ठरविण्याचा अधिकार प्राधिकारणाला नसल्याने याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करता येत नसल्याचा निर्वाळा लवादाने दिला. (प्रतिनिधी)मानहानी याचिका करणार दाखल मनपाच्या विरोधात दाखल करणार्‍याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे. तथापी, संबंधिताने मनपाच्या कामात अडथळे आणले, सदस्यांच्या पात्रतेवर शंका उपस्थित केल्याने सदस्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नाझरे यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. - संजय चव्हाण, नगरसेवक