शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
3
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
4
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
5
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
6
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
7
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
10
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
11
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
12
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
13
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
14
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
15
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
16
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
17
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
18
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
19
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
20
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू

हिरवा वाटाणा बाजारात दाखल; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:49 PM

पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कमीत कमी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया सर्वच फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, ग्वाल्हेर या परिसरातून हिरवा वाटाणा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने त्याचा परिणाम अन्य फळभाज्यांच्या बाजारभावावर झाला आहे.

ठळक मुद्देदरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान बाजार समितीत हिरवा वाटाणा ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीवाटाण्यामुळेच बाजारभाव कोसळले 

पंचवटी : पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कमीत कमी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया सर्वच फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, ग्वाल्हेर या परिसरातून हिरवा वाटाणा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने त्याचा परिणाम अन्य फळभाज्यांच्या बाजारभावावर झाला आहे.  बाजार समितीत वांगी, कारले, काकडी, भोपळा, गिलका, दोडके शिमला मीरची असा फळभाज्यांचा माल विक्रीसाठी दाखल होत आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून बाजारात वाटाण्याची विक्रमी आवक होऊ लागल्याने त्याचा परिणाम अन्य फळभाज्यांवर झाला आहे.  बाजार समितीत हिरवा वाटाणा ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे, तर किरकोळ बाजारात अन्य फळभाज्याही ६० रुपये दराने विक्री होत आहेत. शिमला, दोडका, कारली, भोपळा हा शेतमाल वर्षभर असतो, तर वाटाणा केवळ हिवाळ्यात येत असल्याने सध्या ग्राहकांकडून वाटाणा खरेदीवर भर दिला जात आहे.  वाटाण्याची आवक  वाढलेली असल्याने त्यातच  ४० रुपये किलो बाजारभाव असल्याने अन्य फळभाज्यांपेक्षा वाटाणा स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांकडून वाटाण्याला मागणी वाढली आहे.  बाजार समितीत मंगळवारी (दि. २०) भोपळा एक ते दोन रुपये नग या दराने विक्री झाला तर काकडीला १०ते १२ रुपये किलो, शिमला मारची २५ रुपये, वांगे २० रुपये, कारले २५ रुपये, गिलके बारा ते पंधरा रुपये किलो असा बाजारभाव मिळाल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.वाटाण्यामुळेच बाजारभाव कोसळले बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश तसेच अन्य भागांतून हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत आहे. अन्य फळभाज्यांपेक्षा वाटाणा स्वस्त मिळत आहे. त्यातच वाटाणा हा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे, तर अन्य फळभाज्या वर्षभर मिळतात. त्यामुळे ग्राहक वाटाणा खरेदीवर भर देत असल्याने अन्य फळभाज्यांचे भाव घसरले आहेत.

टॅग्स :market yardमार्केट यार्डvegetableभाज्या