शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

हरित नोआ ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:07 IST

एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रॉस : फॉरेन गटात नाशिकच्या यश पवारने वेधले लक्ष नाशिक : एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रॉस मोटारबाइक स्पर्धेच्या चौथ्या फेरीत केरळच्या हरित नोआ याने नाशिकचा चौथा राऊंड जिंकून विजयाकडे आगेकूच सुरूच ठेवली. या कामगिरीच्या आधारे त्याने आपल्या गुणात ४० गुणांची भर घालत आघाडी घेतली असून, आता त्याचे लक्ष इंदूर येथील स्पर्धेकडे असणार आहे. अंतिम राऊंड पुणे येथे होणार आहे.

एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रॉस : फॉरेन गटात नाशिकच्या यश पवारने वेधले लक्ष

नाशिक : एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रॉस मोटारबाइक स्पर्धेच्या चौथ्या फेरीत केरळच्या हरित नोआ याने नाशिकचा चौथा राऊंड जिंकून विजयाकडे आगेकूच सुरूच ठेवली. या कामगिरीच्या आधारे त्याने आपल्या गुणात ४० गुणांची भर घालत आघाडी घेतली असून, आता त्याचे लक्ष इंदूर येथील स्पर्धेकडे असणार आहे. अंतिम राऊंड पुणे येथे होणार आहे.नाशिकमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या एमआरएफ मोटोक्रॉस स्पर्धेविषयी नाशिककरांना प्रचंड उत्सुकता होती. सुयोजित व्हेरिडीयन व्हॅली येथे तयार करण्यात आलेल्या रेसिंग मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत नाशिककरांना आंतरराष्टÑीय मोटारबाइक स्पर्धेचा अनुभव मिळाला. वेग, कौशल्य आणि नियंत्रण अशा साहसातून रंगलेल्या मोटारबाइक जम्पिंग स्पर्धेत नाशिककरांनी राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय राईडर्सचा खेळ जवळून बघितला. सकाळी १० वाजता नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादात स्पर्धेला प्रारंभ झाला.गोवा, कोईम्बतुर आणि जयपूर येथे झालेल्या तीन फेºयांनंतर चौथी फेरी नाशिकमध्ये घेण्यात आली. यापूर्वी झालेल्या तीनही फेºयांमध्ये आघाडीवर असलेल्या नोआ याच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष होते. त्याने जम्पिंग आणि टेबलटॉप जम्ंिपगचा अफलातून आविष्कार घडवत बाइकवरील नियंत्रण सिद्ध केले. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर तो टीव्हीएस गटातील बेस्ट रायडर आॅफ रेस किताबाचा मानकरी ठरला. नाशिकच्या फेरीत सुमारे ७० स्पर्धक सहभागी झाले होते. विजेते खेळाडू१-एसएक्स -एक (फॉरेन ग्रुप ए)-टु फोर स्टोक (पुढील २५० सीसी टू स्ट्रोक आणि ५०० सीसी फोर स्ट्रोक) - हरित नोआ सी.डी.जिनान, जावेद शेख, यश पवार, आणि ऋग्वेद बार्गव.२- नोव्हाइस क्लास ग्रुप -सी (टू फोर स्ट्रोक-२६० सीसी वरील)इम्रान पाशा, महेश व्ही.एम. राजेंद्र आर.ई, अंकुश राव,३- इंडियन एक्सपर्ट क्लास -सी टू फोर स्ट्रोक (२६० सीसीवरील)महेश व्ही.एम, आर. नटराज, इम्रान पाशा, जगदीश कुमार, हाफीज अहमद४-प्रायव्हेट इक्सपर्ट्स(ग्रुप सी अपटू २६० सीसी मोटो 1)महेश व्ही.एम. जगदीश कुमार, काली मोहन, मोहमंद फजल अदमानी.५-सिक्स ग्रुप ए- सट्रोक २ टू ४ अपटूु २५० सीसी ते ५०० सीसी मोटो २-सईद रहेमान, अदनान अहमद, रिझवान शेख, एम.एस. प्रिन्सज्यु.सिक्स -ग्रुप ए,बी,सी,डी स्ट्रोक२ टू ४ ल अप टू ३५० सीसी -मोटो १युवराज देशमुख, करण कार्ले, सार्थक चव्हाण, श्लोक घोरपडे.अन् साºयांच्याच काळजाचा चुकला ठोकास्पर्धा ऐन रंगात आलेली असताना हवेत उडणाºया मोटारबाइक्स बरोबरच प्रत्येकाचा श्वास रोखला जात होता. उंच झेपावणारा बाइकस्वार हवेतच जेव्हा दुचाकीवरून उलटा झाला आणि तितक्याच वेगात तो बाइकसह खाली आल्याने साºयांचाच श्वास रोखला गेला. उंचावरून तो पाठीवर पडला आणि बाईक त्याच्या अंगावर येऊन आदळल्याने मोठी दुर्घटना घडल्याने साºयांच्याच काळजाचा ठोका चुकला, मात्र रेस्क्यू टीमचे प्रयत्न आणि सुरक्षित पेहरावामुळे बाइकस्वार बचावला.यश पवार पाचवाफॉरेन ग्रुप ए गटातून राईडी करणाºया नाशिकच्या यश पवारच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. अत्यंत नामवंत बाइकर्स असलेल्या या गटातून यशने चांगली लढत दिली. मात्र त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटातून नोआने सुरुवातीपासून मिळविलेली आघाडी कायम राखत नाशिकमधील विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा आठ प्रकारात घेण्यात आली. नाशिकसाठी स्थानिक बाइकर्ससाठी रेसचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नाशिकमधून बाइक रायडर्सचा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. नाशिकचे आदित्य ठक्कर, हर्षल कडभाने, गणेश लोखंडे यांनी सादरीकरण केले. रॅलीस सुरुवात झाल्यानंतर सहभागी चालकांनी निश्चित वेळेत स्पर्धेचे सर्व टप्पे पार केले. मात्र गाडीच्या नादुरुस्तीसह इतर कारणांनी चालकाला अपयश आल्यास त्याने किमान जोकर लेनमधून रॅली एक टप्पा पूर्ण करणे आवश्यक असते. याप्रसंगी श्याम कोठारी, सुनीता राणा, अमित वाघचौरे, अमेय कोठारी, यश पवार, रवी वाघचौरे, विनय चुंबळे उपस्थित होते.