शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

ग्रीन जिम दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:27 AM

सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

सातपूर : सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभाग सभा घेण्यात आली. सातपूर विभागातील जवळपास सर्वच प्रभागांमधील उद्यानात लाखो रु पयांची खेळणी बसविण्यासाठीचे प्राकलने प्रशासकीय मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात आली होती. खेळणी बसविण्याच्या कामांना मंजुरी देताना मनसे गटनेते सलीम शेख यांनी खेळणी बसविल्यानंतर त्यांची देखभालीची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात यावी, तसा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनीदेखील दुजोरा दिला. सातपूर तरणतलाव सुरू करण्यात यावा, गलिच्छवस्ती सुधार योजनेतील राखीव निधीतून स्लम भागातील समस्या सोडविण्यात याव्यात, अशीही मागणी शेख यांनी केली. सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, त्यांची त्वरित दुरु स्ती करण्यात यावी, अशी मागणी नयना गांगुर्डे यांनी केली. मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी योगेश शेवरे यांनी केली. प्रत्येक काम आणि समस्या सांगितल्यानंतरच अधिकारी कामे करतात, असे दिलीप दातीर म्हणाले, तर अधिकारी कामे करीत नाहीत. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशी खंत रवींद्र धिवरे यांनी व्यक्त केली. यावेळी दीक्षा लोंढे, इंदूबाई नागरे, भागवत आरोटे, विजय भंदुरे, दशरथ लोखंडे यांनीही विविध मागण्या केल्या. यावेळी नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, माधुरी बोलकर यांच्यासह विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, संजय पाटील, श्याम वाईकर, माधुरी तांबे, डॉ. रुचिता पावसकर, डॉ. प्रमोद सोनवणे, एस. एल. अग्रवाल, सलीम शेख, वृषाली रोडे, प्रदीप परदेशी आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.नवनियुक्त अशासकीय सदस्य विजय भंदुरे व दशरथ लोखंडे यांनी प्रभाग सभेत नियुक्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झालेल्या हेमलता कांडेकर यांचाही सभागृहाच्या वतीने प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर प्रभाग क्रमांक १० मधून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका इंदूबाई नागरे यांचेही सभागृहात स्वागत करण्यात आले. नाशिक भूषण पुरस्कार मिळालेल्या नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांचाही सत्कार करण्यात आला.४सातपूर विभागातील विविध उद्यानांमध्ये सुमारे ६५ लाख रुपयांची खेळणी व ग्रीन जीम बसविण्यात येणार आहे, तर याच उद्यानांमध्ये सुमारे १५ लाख रु पये खर्चून स्टेडियममध्ये बँचेस बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक