दिंडोरीतील कादवानगर परिसरात ग्रीन सिटी नावाची वसाहत गेल्या पाच सहा वर्षांपासून नावारूपास आली आहे. दिंडोरी शहरातील हा भाग तसा मध्यमवर्गीय नोकरदारांचा म्हणून ओळखला जातो. या ग्रीन सिटीत सर्वत्र झाडे लावण्याचा संकल्प युवकांनी सोडला आहे. अरुणोदय सामाजिक संस्थेनेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी नितीन धिंदळे, नितीन गांगुर्डे, सतीश निकम, सुरेश राजोळे, अॅड. गणेश बोरस्ते, दिनेश धांडबळे, पुंडलिक चारोस्कर, संदीप वाघचौरे, रामदास महाले, राजू खिरकाडे, किशोर पाटील, नागेश सोमवंशी, गोरख पवार, राजेंद्र जाधव, कैलास गायकवाड, डॉ. बोरगुडेे, ज्ञानेश्वर पिंंगळे, विठ्ठल पिंगळे, अमोल उगले, धनंजय बोरस्ते, यादव बोरस्ते, मनोज मवाळ, विकी घोलप, वैभव गायकवाड आदी युवक परिश्रम घेत आहेत.
कोट....
आगामी काळात या परिसरात ग्रीन जिम उभी करण्याचा संकल्प युवकांनी सोडला आहे. वृक्षारोपण मोहीम यशस्वी झाल्यानंतर ग्रीन सिटीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या अभियानात ग्रीन सिटी, कादवानगर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन होणार असून, परिसराचे सुशोभीकरणही होणार आहे. सर्व युवक, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी होत चालला आहे.
- नितीन धिदंळे, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी