शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:00 PM

एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देजाखोरीच्या शेतकऱ्याचे नुकसान: भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.दारणा नदिवर जाखोरी गावाजवळ पुल बांधलेला आहे. हा रस्ता शिंदे येथील पुणा हायवेपासून ओझरच्या दहावा मैलाजवळ आग्रा हायवेला मिळतो. जाखोरी गावालगत असलेल्या शेतालगत रस्ता होण्यापूर्वी मोठा नाला होता. त्यामुळे उताराने पाणी वाहत येऊन या नाल्यामधून नदीला मिळत असे. मात्र या हायवेचे काम सुरु झाले. रस्ता तयार झाला. त्यामुळे मुळ नाला बुजला गेला.पर्यायाने पावसाळ्यात शेतांमधून उताºयाने वाहून येणारे पाणी पुला लगतच्या विठोबा महिपती जगळे यांच्या गट नंबर 536 मधून वाहत असल्याने दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुमारे आठ ते दहा किलोमिटर परिसरातील उतारावरचे पाणी वाहत आल्याने दारणा नदीवरील पुलालगत असलेल्या जगळे यांच्या शेतातील माती खचून वाहून जाऊन सुमारे दोन गुंठे जागेत मोठे भगदाड पडले.त्यामुळे शेजारील पुलालाही धोका निर्माण झाला आहे. या भगदाडापासून दहा- पंधरा फुटाच्या अंतरावर महापारेषण कंपनीचा मोठा टॉवर आहे. जमिन भुसभुसित असल्याने अजुन एखादा मोठा पाऊस पडला तर जमिन खचत जाऊन या टॉवरलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकिकडे पुल आणि दुसरीकडे टॉवर अशा दुहेरी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.या रस्त्याचे काम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी नाला पूर्ववत करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.वरच्या बाजुला जाखोरी ब्राम्हणवाडे रस्त्याच्या पलीकडून उतावर असलेल्या संतोष ताजणे, तुकाराम कटाळे, किशोर कटाळे, नारायण ताजणे, शरद ताजणे, सैय्यद, शेलार, जगळे, पगारे, बागुल यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहत येऊन विठोबा महिपत जगळे यांच्या शेतात साचल्याने तेथील माती झिजून नदीत प्रवाहित झाल्याने मोठे भगदाड पडले आहे.या भगदाडात सुमारे 40-45 ट्रक माती भरावी लागेल.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली तयार करुन रस्त्याला कठडे तयार करावेत अशी मागणी स्वप्नील जगळे यांनी केली आहे.दारणेच्या पुलालगत आमची शेती आहे. पूर्वी येथे मोठा नाला असल्याने पाणी वाहून जात होतो. मात्र रस्त्याच्या कामामुळे नाला बुजला गेला.त्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी आमच्या शेतात शिरुन नुकसान होते.वारंवार पाठपुरावा करुनही नाला पूर्ववत केला जात नाही. पावसाने गट नंबर 536 मध्ये मोठे भगदाड पडले. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी.-परशराम विठोबा जगळे, जाखोरी.

 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा