शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

एकांकिकांमधून ‘कालिदास’प्रती कृतज्ञता

By admin | Updated: July 15, 2017 00:22 IST

नाट्यगृहाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने ‘नाट्यसेवा’तर्फे एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकच्या नाट्यसंस्कृतीचा मानबिंदू म्हणून ओळखले जाणारे महाकवी कालिदास कलामंदिर दुरुस्ती व देखभालीसाठी एक वर्ष बंद राहणार असल्याने या नाट्यगृहाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने ‘नाट्यसेवा’तर्फे एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या एकांकिका महोत्सवात नाट्यगृहाने नवकलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ तसेच या रंगभूमीने घडवलेले कलाकार यांच्याबाबत बोलताना अखिल भारतीय नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी या प्रकारचा महोत्सव राबविणे ही अभिनव संकल्पना असल्याचे सांगितले. नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी आगामी काळात कालिदास कलामंदिरचे नवे रूपडे रसिकांसमोर येईल तेव्हा नाटकेही नव्या रूपात यायला हवी, तसेच तिच तिच नाट्यकलाकृती सादर करण्यापेक्षा रंगकर्मींनी बदल घडवून आणणे आवश्यक आहे, याकडेही सचिन शिंदे यांनी लक्ष वेधले.  दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आरामासाठी आतुरतेने वाट पहाणाऱ्या तसेच सुटीचा आनंद लुटणारा रविवार आल्यावर आयुष्यात कसे आमूलाग्र बदल घडतात याचे दृश्य ‘एव्हरी डे इज संडे’ या एकांकिकेतून दाखविण्यात आले. शंतनू चंद्रात्रे लिखित आणि रोहित पगारे दिग्दर्शित या एकांकिकेत मनाली धात्रक, रोहित पगारे, सतीश वराडे या कलाकारांचा समावेश होता तर गरज आणि लालसेतून माणसाला कुठल्या कुठल्या टप्प्यातून जावे लागते याचे दृश्य ‘मसणदान’ या एकांकिके तून दाखविण्यात आले. एकांकिका महोत्सवाची सांगता धनंजय गोसावी आणि राहुल गायकवाड दिग्दर्शित ‘फारमर’ या नाटकाने झाली. यावेळी माणिक कानडे, प्रकाश साळवे, विद्याधर निरंतर, सुनील ढगे, राजेंद्र जाधव, श्याम लोंढे यांच्यासह नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.