राजापूर येथे गवत निमित्ती रोपवाटीका यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:04 PM2021-03-07T17:04:56+5:302021-03-07T17:05:53+5:30

राजापुर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावाजवळ पिशव्या व त्यात गवती बि टाकून सध्यस्थितीमध्ये चांगल्याप्रकारे गवती रोपांची वाढ डौलदार होताना दिसत आहेत. वडपाझर तलावातील पाणी हे सौरऊर्जा पंपाच्या सहाय्याने उचलून वडपाटी पाझर तलावाजवळ एक बिघा जागेत हरिण, काळवीट आदी वन्य प्राण्यांची भुक भागविण्यायासाठी वन विभागाच्या वतीने गवती कुरण रोपवाटिका तयार केली आहे.

Grass Nimitti Success at Rajapur | राजापूर येथे गवत निमित्ती रोपवाटीका यशस्वी

राजापूर येथे गवत निमित्ती रोपवाटीका यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देराजापूर ममदापूर संवर्धन राखीव बरोबर गवती कुरणांचा विकास होणार आहे.

राजापुर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावाजवळ पिशव्या व त्यात गवती बि टाकून सध्यस्थितीमध्ये चांगल्याप्रकारे गवती रोपांची वाढ डौलदार होताना दिसत आहेत. वडपाझर तलावातील पाणी हे सौरऊर्जा पंपाच्या सहाय्याने उचलून वडपाटी पाझर तलावाजवळ एक बिघा जागेत हरिण, काळवीट आदी वन्य प्राण्यांची भुक भागविण्यायासाठी वन विभागाच्या वतीने गवती कुरण रोपवाटिका तयार केली आहे.
वन विभागाने व्यवस्थापन करून राजापूर वन विभाग व ममदापूर वन संवर्धन राखीव जागेमध्ये वन्यप्राण्यांसाठी पोषक अश्या गवताची निर्मिती करण्यात येत आहे. या गवतामुळे काळविटांना मुबलक प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे गवत उपलब्ध होणार आहे.

ममदापूर संवर्धन राखीव मध्ये हेमाटा, पोवण्या, मारवेल अंजन, दीनानाथ धामण, दशरथ, डोंगरी इत्यादी प्रकारातील गवताच्या प्रजाती तयार केल्या आहेत. या गवताची लागवड ही पावसाळ्यामध्ये केली जाणार आहेत. वन विभागाच्या वन जंगलात या गवताची लागवड करून काळवीट, हरण आदी प्राण्याच्या अन्नासाठी होणारी वणवण थांबणार आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्याने उत्तम अशी रोपवाटिकेची निर्मिती केली आहे. . ममदापूर संवर्धनमध्ये अशी लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गवताच्या लागवडीमुळे ममदापूर संवर्धन राखीव मधील जैवविविधता जपली जाणार आहे. राजापूर ममदापूर संवर्धन राखीव बरोबर गवती कुरणांचा विकास होणार आहे.

या करीता डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक वनसंरक्षक मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी येवला बशीर शेख, एम. बी. पवार, वनपाल राजापूर, पी. एस. पाटील, वनरक्षक येवला, जी. आर. हरगावकर वनरक्षक, राजापूर ममदापूर वन बीटचे ज्ञानेशवर वाघ, पोपट वाघ हे वन कर्मचारी या रोपवाटीकेची देखभाल वन मजूर राजापूर मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे हे गवती कुरण यशस्वी होण्यास प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Grass Nimitti Success at Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.