शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

द्राक्षे चोरली म्हणून नाशिकला अल्पवयीन मुलांना विवस्र करून पाठविले घरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:54 IST

पंचवटी भागातील एका द्राक्षबागेतून शनिवारी दुपारी दोघा १० ते १२ वयोगटांतील अल्पवयीन मुलांनी द्राक्षे चोरल्याने कामगारांनी त्यांना पकडून त्यांना विवस्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

नाशिक : पंचवटी भागातील एका द्राक्षबागेतून शनिवारी दुपारी दोघा १० ते १२ वयोगटांतील अल्पवयीन मुलांनी द्राक्षे चोरल्याने कामगारांनी त्यांना पकडून त्यांना विवस्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.घटनेनंतर रडत रडत रस्त्याने जाणाऱ्या विवस्र मुलांना एका पोलीस कर्मचाºयाने बघितले. त्याने घटनेची माहिती घेतली व द्राक्षबागेतील कर्मचाºयांना पोलिसी भाषेत दरडावले. त्यानंतर त्या मुलांचे कपडे परत केले व नंतर दोघे अल्पवयीन घराकडे रवाना झाले. द्राक्षबागेत खुडा सुरू आहे. काही दिवसांपासून परिसरातील मुले शेताजवळून जाताना कॅरेटमधील द्राक्षे काढून नेतात, अशी द्राक्ष बागायतदाराची तक्रार आहे. दोन ते तीन वेळा द्राक्षे चोरण्याचा प्रकार घडल्यानंतर शनिवारी दुपारच्या वेळी पुन्हा असाच प्रकार घडला. त्यावेळी कामगारांनी अल्पवयीन मुलांना पकडले व त्यांना चोपही दिला. त्यानंतर जवळील प्रसाधन गृहाशेजारी नेऊन त्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना विवस्त्र केले व तसेच पाठवून दिले. रस्त्याने जाणाºयांना ही मुले विवस्त्र का जात आहेत, हे लक्षात आले नाही. ही मुले द्राक्षबागेतून द्राक्षे चोरतात, अशी तक्रार त्यांच्या कुटुंबीयांकडे करण्यात आली होती. मात्र मुले लहान असल्याने समजून घ्या, असा सल्ला त्यांच्या कुटुंबीयांनी दिला होता, असे कामगारांनी सांगितले.द्र्राक्षचोरी केली म्हणून त्या मुलांच्या अंगावरचे कपडे काढून विवस्र केले गेल्याने परिसरात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित प्रकाराची पोलीस स्वत:हून दखल घेऊन दोषींवर पोलीस कारवाई करणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.शनिवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीने मुले रस्त्याने विवस्र जात होती. लोक त्यांच्याकडे पाहत होते, मात्र अल्पवयीन मुलांना मारहाण करून विवस्र केल्याची कोणालाही माहिती नव्हती.द्राक्षबागेच्या परिसरातून जात असताना दोन मुलांनी केवळ द्राक्ष चोरले म्हणून त्यांना पकडण्यात आले आणि त्यांचे कपडे काढून घेण्यात आले. तसेच मुलांना मारहाण करण्यात आली, ही गंभीर बाब आहे.- अमित भोईर, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी