शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाला तडे...कांदा सडतोय, तर गहू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 19:03 IST

जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.

ठळक मुद्देसंकटाची मालिका अजूनही सुरूच

जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.                                                सध्या अनेक शेतकरी द्राक्ष बागेसाठी व्यापारी शोधत असून पंधरा ते वीस रुपये व्यापारी द्राक्षबागेला मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा भाव वाढतील या आशेने लावून धरल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बागेची बहुतेक कामे आटोपते आल्याने शेतकऱ्यांना आता पडत असलेल्या वादळी वारा, पाऊस व धुके पडत असलेल्या दवाने द्राक्षाच्या मण्यांना तडे जात आहे. अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

                      द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहे. या संकटावर मात करून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. गेली तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण व गुरुवारपासून वादळी वारे व पाऊस यामुळे अनेक द्राक्ष बागांना फटका बसला आहे. यामुळे द्राक्ष बागेला भरमसाठ खर्च करावा लागत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.काढणीला आलेला कांदा शेतातच सडलाद्राक्ष पाठोपाठ शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते पण कांदा पीकही करपा, मावा, तुडतुडेच्या विळख्यात सापडल्याने व काढणीला आलेला कांदा शेतातच सडत आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला शेतकरी औषधांवर औषधे फवारणी करुनही पाहिजे, असे उत्पादन लाल कांदा पिकातून निघत नसल्याने तसेच कांद्याला मिळत असलेला भाव हा शेतकरीवर्गाला खूश करत असला तरी शेतकरीही कांदा पिकावर भरमसाठ खर्च करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.मागील वर्षी कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने या वर्षीही द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटाची मालिका अजूनही सुरूच आहे. भरमसाठ खर्च होऊनही पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही वादळी वारा व पावसाने मारा केल्याने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मोठा खर्च होत असून संकटावर संकट येत आहे.- बाबासाहेब शिंदे, द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊर 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती