शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या धास्तीने द्राक्ष उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:18 IST

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.परिसरात मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच विविध प्रकारच्या रोगांच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग सातत्याने रब्बी हंगामातील पिकांवर औषध फवारणी करत असून त्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे.वातावरणातील या बदलामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला असून द्राक्ष व कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून कधीमधी रात्रीच्या वेळी सुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे आढळून आले आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्याला यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असताना, कांदा लागवडीसाठी रोपांची वानवा आहे. यंदा कांद्याचे दर हे तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्व सामान्य शेतकºयांना आवाक्या बाहेर झाले आहे.इन्फो...कांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला देखील सोन्याचा भाव मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरी वर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याच्या बियाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून एव्हढ्या महागड्या दराने बी घेऊन कांदा लागबडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना धास्ती केवळ अवकाळी पावसाची लागली आहे.चौकट....द्राक्षे बागेला द्राक्षे फळ लागले असून ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने अवकाळी पावसातून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च हा वाया जाणार असून शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खायीत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके,द्राक्ष उत्पादक शेतकरी, मानोरी.(फोटो २६ मानोरी ५)मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्याने झाकून ठेवलेल्या मक्याचा गंज.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस