शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:53 IST

निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेती व्यवसायाला घरघर : खते, मजुरीच्या खर्चामुळे आर्थिक पेच

शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे.निफाड तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग हा द्राक्ष उत्पादन निर्मितीमध्ये अग्रेसर असून, द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक  व परकीय चलन मिळवून देणारे एक असले तरी सध्याच्या मिळत असलेल्या कोसळत्या बाजारभावामुळे आता ते भरवशाचे पीक राहिले नाही. परिसरातून स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतकरी तसेच व्यापारी द्राक्षे पाठविण्याचे काम करीत असतात. मागील वर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खर्च अधिक व उत्पादन शून्य झाले असून, यावर्षीसुद्धा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.सद्य:स्थितीत स्थानिक बाजारपेठाअंतर्गत द्राक्षाला २० ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठअंतर्गत निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाला ३० ते ४० रुपयांपर्यंत इतकाच भाव मिळत असल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न हे खर्च वजा जाता काहीच नसल्यामुळे तसेच द्राक्षपीक हे दिवसेंदिवस मजुरीचे वाढते दर, औषधे व खतांचे खर्च यामुळे अतिशय खर्चिक होत आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हे पीक  परवडेनासे झाले आहे. या बाबीतून सावरण्यासाठी तसेच शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व शेती व्यवसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी स्थानिक पातळीपासून शासनापर्यंत आर्थिक बळ देणे गरजेचे आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतीव्यवसायाला नित्याचीच घरघर लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी