शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय जोडप्यांना दोन वर्षांनंतर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:00 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया योजनेसाठी दोन वर्षांनंतर अखेर केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्णातील ३२१ आंतरजातीय जोडप्यांना समाजकल्याण विभागाने प्रोत्साहन अनुदान अदा केले आहे.

ठळक मुद्देकेंद्राचा निधी प्राप्त : व्हिडिओद्वारे पटविली ओळख

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया योजनेसाठी दोन वर्षांनंतर अखेर केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्णातील ३२१ आंतरजातीय जोडप्यांना समाजकल्याण विभागाने प्रोत्साहन अनुदान अदा केले आहे. या योजनेवर सुमारे दीड कोटींहून अधिक रक्कम खर्ची पडली असून, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही समाजकल्याण विभागाने व्हिडिओ कॉलद्वारे जोडप्यांची खात्री पटवून त्यांच्या बॅँक खात्यावर पैसे जमा केले आहेत.समाजातील जातीयता नष्ट करण्याबरोबर सर्वधर्मसमभाव जोपासला जावा यासाठी आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी रोख रक्कम देण्याची योजना राबविली जात आहे. आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांमध्ये एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमातीतील असणे बंधनकारक असून, त्यांनी तसा प्रस्ताव समाजकल्याण खात्याकडे सुपूर्द केल्यास पुराव्यांची पडताळणी करून सुमारे ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून राबविण्यात येणाºया या योजनेसाठी सन २०१८- १९ या दोन वर्षांसाठी राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याचे एक कोटी रुपये समाजकल्याण खात्याकडे वर्ग केले. मात्र सन २०१८ मध्ये केंद्र सरकारने या योजनेसाठी स्वत:चा हिस्सा दिला नाही. त्यामुळे केंद्राच्या निधीअभावी आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना योजनेचा लाभ देता आला नाही. यासाठी राज्य सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर ३१ मार्च २०२० रोजी केंद्र सरकारने या योजनेसाठी दोन वर्षांचे एक कोटीचे अनुदानापोटी ६० लाख रुपये दिले. त्यामुळे समाजकल्याण विभागाने एक कोटी ६० लाख रुपयांच्या अनुदानातून आंंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.गेल्या दोन वर्षांपासून या योजनेसाठी सुमारे ४९५ प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून ३२१ जोडप्यांना पात्र ठरविण्यात आले. या सर्वांची खात्री पटविण्यात येऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिल्याने कोरोना काळात आंतरजातीय जोडप्यांना शासनाच्या योजनेचा लाभ अदा करण्यात आला आहे. निधीअभावी अद्याप १७४ जोडपे प्रतीक्षेत आहेत.कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याकारणाने आंतरजातीय जोडप्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत समाजकल्याण खात्यापुढे आव्हान होते. त्यावर उपाय म्हणून समाजकल्याण निरीक्षकांनी या जोडप्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ते एकत्र असल्याची खात्री केली. अनेक वेळा त्यांना या जोडप्यांशी संपर्क साधावा लागला. ३२१ जोडप्यांची खात्री करण्यासाठी अनेक खटपटी यंत्रणेला कराव्या लागल्यानंतर त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचविता आला आहे.

टॅग्स :marriageलग्न