शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नातवंडांकडून आजोबाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:28 IST

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत खड्ड्यात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिघा संशयित नातवंडांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देतिघे ताब्यात : खोसकर यांच्या हत्येचा उलगडा

नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत खड्ड्यात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिघा संशयित नातवंडांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली.सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक शांतिलाल चव्हाण यांनी फिर्याद दिली. मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळून आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे गिरणारे गावापासून पुढे काही अंतरावर नाईकवाडी गाव आहे. त्यांच्या भाऊबंदापैकी एका चुलत्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. तसेच दुसरा भाऊ काशीनाथ खोसकर हेदेखील मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत. खोसकर बंधूंपैकी एकाचा खून तर दुसरे अजूनही बेपत्ता असून, तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. या घटनांमुळे नाईकवाडी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. ज्यांचा खून झाला ते रामदास हे बेपत्ता असलेले काशीनाथ यांचे मोठे बंधू होत.मयत खोसकर यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.या गुन्ह्यात मयत रामदास यांचे नातू अंकुश सुभाष खोसकर, लक्ष्मण प्रभाकर खोसकर, सुखदेव खोसकर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात कोणत्या शस्त्रांचा वापर केला? याचा तपास पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा कोठे घडला याचाही उलगडा अद्याप झालेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून