शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराची भिंत कोसळून आजोबासह नातू ठार

By धनंजय वाखारे | Updated: September 8, 2023 11:30 IST

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी व ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले.

- भगवान गायकवाड

दिंडोरी - तालुक्यातील नळवाडपाडा शिवारातील वस्तीवर  एका बंद कंपनीच्या जुन्या खोलीत झोपलेले गुलाब वामन खरे (आजोबा) विठाबाई गुलाब खरे, निशांत विशाल खरे (नातू) रा. नळवाडी हे सदर खोलीचे छत कोसळून दाबले गेले, यात आजोबा गुलाब खरे व निशांत खरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर ग्रामस्थ अन प्रशासनाने वेळीच मदत कार्य राबवत आजी ला सुखरूप बाहेर काढले.

गुरुवारी पहाटे पासून तालुक्यात पाऊस सुरू असून दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या असून त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे खरे हे रात्री नेहमी सदर खोलीत पत्नी व नातू समवेत राहत होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळत त्याखाली ते दाबले गेले, शेजारी त्यांचे मुलाला आवाज येताच त्यांनी तेथे बघितले असता त्यांना आई वडील मुलगा छता खाली दाबल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित व ग्रामस्थांना कळवले सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली. 

जेसीबी आणणार आले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी व ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा व नातू मयत झाले होते तर जखमी आजी विठाबाई  यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात नेले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेटली. ग्रामस्थांनी पावसात मदतकार्य करत आजीचे प्राण वाचवले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक