शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणची शहर पोलिसांवर ६९ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:35 IST

पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला.   

ठळक मुद्देपोलीस वर्धापन दिन : कवायत मैदानावर रंगला प्रेक्षणीय सामना

नाशिक : पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला.   पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. ८) शहरातील पोलीस कवायत मैदानावर ग्रामीण पोलीस विरुद्ध शहर पोलीस दलाच्या प्रेक्षणीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता पोलीस आयुक्त दीपक पांडे व पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला प्रारंभ झाला. ग्रामीण पोलीस दलाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा  निर्णय घेतला. या संघाने नियोजित १२ षटकांत विक्रमी १६१ धावांचा डोंगर उभा करून शहर पोलिसांसमोर विजयासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले. यात ग्रामीण पोलीस दलाचे उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी तडाखेबंद १०९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरारादाखल  विजयासाठी १६२ धावांचे आव्हान समोर घेऊन मैदानात उतरलेल्या शहर पोलीस दलाचा संघ १२ षटकात अवघ्या ९२ धावाच करू शकला. यामुळे ग्रामीण दलाचा ६९ धावांनी विजय झाला. या सामन्यात शतक ठोकणाऱ्या स्वप्निल राजपूत यांना सामनावीर पुरस्काराने तर सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौघुले - श्रींगी, अतिरिक्त अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.सांघिक भावनेसाठी खेळ महत्त्वाचाक्रिकेटसह कोणताही मैदानी खेळ हा शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. खेळातून मानसिक आरोग्य सुधारण्यासाह सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. ज्याचा उपयोग प्रत्यक्ष कामगिरीत होतो. त्यामुळे प्रत्येकाने खेळले पाहिजे, शारीरिक तंदुरुस्ती जपली पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयpolice parade groundपोलिस कवायत मैदान