लोहोणेर : भऊर येथे दारूबंदी विशेष ग्रामसभेत दारूबंदी ठराव करण्यात आला. ग्रामसभेस महिलांसह तरुणवर्ग व ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. भऊर गावात मद्यपी आढळल्यास सुमारे ११ हजार (अकरा हजार) रुपयांचा दंड आकारण्यात यावा, असा ठराव ग्रामस्थांनी केल्याने दारुड्यांच्या पाचावर धारण बसली. गावात मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मद्यपींनी उच्छाद मांडला होता.मद्यपीबरोबर मध तयार करणे, विक्री करण्याचा धंदा तेजीत असल्याने शेती व इतर कामांसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले व भऊर ग्रामपंचायतीच्या वतीने येथील मारुती मंदिराच्या आवारात ज्येष्ठ नागरिक कारभारी हरी पवार यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, महिला व तरुण वर्गाने दारूबंदीविषयी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या ग्रामसभेस उपसरपंच कडू पवार, दादाजी पवार, सुनील पवार, काशीनाथ पवार, माजी उपसरपंच रणजित पवार, मो.रा. पवार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी माळी, रंजना गरुड, काकाजी पवार, उमेश पवार, बापू गरुड, जयवंत पवार, प्रकाश पवार, अनुसयाबाई शिंदे, साळूबाई ठाकरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
भऊर ग्रामसभेत दारूबंदी ठराव
By admin | Updated: June 20, 2014 01:19 IST