शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांना मिळणार पाण्याचा जार, केशर आंबा रोपाची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:30 IST

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली असून, ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय शासनाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना वेतनासाठी करवसुलीचे लक्ष्य दिल्याने तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने थकबाकीसह संपूर्ण कर भरणाऱ्यांना २० लिटर पाण्याचा जार व केशर अंब्याचे रोप भेट देण्याचा उपक्रम राबवला आहे.

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली असून, ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय शासनाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना वेतनासाठी करवसुलीचे लक्ष्य दिल्याने तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने थकबाकीसह संपूर्ण कर भरणाऱ्यांना २० लिटर पाण्याचा जार व केशर अंब्याचे रोप भेट देण्याचा उपक्रम राबवला आहे.घोरवड ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कर भरणा, प्रोत्साहन लाभ योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १५ जुलैपर्यंत ३१ मार्च २०२१ अखेर थकबाकीसह संपूर्ण घरपट्टी, पाणीपट्टी भरणा केलेल्या खतेदारांना २० लिटर पाण्याचा जार व केशर आंब्याचे रोप भेट स्वरूपात देण्यात आले.डोंगरी विकास निधीतून मंजूर अंगणवाडी इमारत बांधकाम व ग्रामपंचायत उत्पन्न स्वनिधीतून श्री क्षेत्र प्रयागराज तीर्थाजवळील सार्वजनिक जागेचे सुशोभिकरण, पायºया व भिंत बांधकाम या कामांचे सरपंच रमेश रामनाथ हगवणे, उपसरपंच सुदाम म्हसाळ, ग्रामपंचायत सदस्य दामू साबळे, अंबादास भुजबळ, प्रयाग अनाथ चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास हगवणे, उपाध्यक्ष हरिभाऊ हगवणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी वनिता हगवणे,संगीता मंडलिक, ज्योती हगवणे, सविता वलहामते, चंद्रकला लहामटे, सोमनाथ गायकवाड, ग्रामसेवक योगेश चित्ते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.------------------आशासेविकांचा सन्मानग्रामपंचायतीच्या ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीतून १० दिव्यांग महिला-पुरुषांना अर्थसाहाय्य धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीविरुद्ध लढणाºया आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी या कोरोनायोद्ध्यांंचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक