शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाड्या-वस्त्यांसाठी ग्रामपंचायतीकडून टॅँकर

By admin | Updated: June 12, 2016 23:42 IST

नांदूरशिंगोटे : नळपाणीपुरवठा योजना नसल्याने पाणीटंचाई; पंचायत समितीचे टॅँकर अनियमित

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. त्यामुळे गावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळपाणीपुरवठा होत आहे. परंतु काही ठिकाणी पाणी योजनेचे पाणी न गेल्याने दरवर्षी तेथे उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाई जाणवते. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाझर तलाव, केटीवेअर बंधारे, सार्वजनिक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती असताना तालुकास्तरावर टॅँकरसाठी प्रस्ताव पाठवले जातात. परंतु पंधरा दिवस उलटूनही पंचायत समितीकडून टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळाची तीव्रता गंभीर असतानाही प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात पाण्यासाठी उपाययोजना होत नाही. गत सप्ताहात नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीने स्वखर्चातून घंटागाडी, पाण्याचा टॅँकर व बसण्यासाठी बाक घेऊन लोकोपयोगी वस्तूंचे लोकार्पण केले होते. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी टंचाई भागात ग्रामपंचायत खर्चातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचे टॅँकर सुरू झाले आहेत. येथील चकोर वस्ती, माकडे वस्ती, कोलधाडवाडी, खारे वस्ती, गर्जे वस्ती, वाळके वस्ती, दौंड वस्ती, शेळके वस्ती, कांगणे वस्ती तसेच चास रोड, मानोरी रोड, बर्के रोड आदि भागातील काही ठिकाणी मागणीनुसार ७ ते ८ खेपा पुरवल्या जात आहेत. तसेच शासनाच्या धोरणानुसार ग्रामपंचायतीने पर्यावरण सप्ताहानिमित्त सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड केली आहे. त्या सर्व ठिकाणीही ग्रामपंचायतीकडून झाडांना पाणी देऊन संवर्धन केले जात आहे. येथील मुख्य जलकुंभाजवळ दररोज टॅँकर भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. (वार्ताहर)