शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:04 IST

एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल धान्याची दरमहा बचत होत आहे.पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरासाठी दरमहा २९,११२ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर असून, त्यापैकी ११,२५५ मेट्रिक टन धान्याची दुकानदारांकडून उचल झाली आहे. जिल्ह्णात एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य वितरण केले जात असून, त्यांचे आधार क्रमांकही जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे पॉस यंत्रातील माहितीशी लाभार्थ्यांची होणारी ओळख व आधारमुळे बोटाचे ठसे जुळत असल्याने रेशनमधून खºया लाभार्थ्यांनाच धान्य मिळू लागले आहे. परिणामी यापूर्वी होणाºया धान्याच्या उचलमध्ये कमालीची तफावत निर्माण झाल्याचे पाहून मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यातूनच धान्य शिल्लक राहात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्णासाठी दोन लाख १५ हजार ८ क्विंटल नियतन मंजूर असले तरी, आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात जवळपास ४० टक्क्याहून कमीच धान्याची उचल करण्यात आली. साधारणत: जिल्ह्णाला मंजूर होणाºया एकूण धान्याच्या नियतनातून दरमहा २० टक्के धान्य शिल्लक राहात असून, त्याचे प्रमाण पाहता ४० हजार क्विंटल धान्य नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा दावा पुरवठा अधिकारी अर्जुन यांनी केला आहे.दीड लाख लाभार्थी निवडणारजिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्य शिल्लक राहात असल्याने ते नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून तहसील पातळीवर लाभार्थी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही लाभार्थी पुढे आलेले नाहीत. शिल्लक राहणारे धान्य सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा अंदाज असल्याने येणाºया काळात लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक