शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आधार नसल्यावरही मिळणार रेशनमधून धान्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:03 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजाराला आळा बसावा व पारदर्शी कामकाजासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘बायोमॅट्रीक’ प्रणालीवर आधारित ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य विक्रीला सुरूवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने या यंत्रणेच्या आधारे केल्या जाणाºया धान्याच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी अद्यापही कायम

ठळक मुद्देपुरवठा खात्याचा निर्णय : ओळखीचा द्याावा लागणार पुरावा अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपुर, लातुर, उस्मानाबाद, औरंगाबाद व अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे या आठ

नाशिक : शिधापत्रिकेला आधार जोडल्याशिवाय रेशनमधून धान्य न देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे निकाल दिला असला तरी, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा शिधापत्रिकाधारकाने आपल्या ओळखीचा अन्य कोणताही पुरावा सादर केला तरी, त्यास धान्य देण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला असल्याने त्याचा लाभ नाशिकसह २५ जिल्ह्यांना होणार आहे. तथापि, आठ जिल्ह्यांमध्ये मात्र प्रायोगिक पातळीवर १ मार्च पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजाराला आळा बसावा व पारदर्शी कामकाजासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘बायोमॅट्रीक’ प्रणालीवर आधारित ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य विक्रीला सुरूवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने या यंत्रणेच्या आधारे केल्या जाणाºया धान्याच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी अद्यापही कायम असून, त्याचा फटका रेशन दुकानदाराला बसत असला तरी, सरकारने त्यात सुधारणा करण्याचे मान्य करून हीच प्रणाली यापुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, किंबहुना शिधापत्रिकेवर नाव असलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड क्रमांक दिल्याशिवाय यापुढे धान्य न देण्याचे ठरविले आहे. शासनाने मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावरी करण्याची तयारी केली होती, परंतु राज्यातील बºयाचशा जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरवठा खात्याकडून आधार सिंडींगचे कामकाज पुर्ण झालेले नाही. त्यातच आधार अद्यावत करण्याच्या नावाखाली अनेक शिधापत्रिकाधारकांचे आधार लिंकींग होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे १ मार्च २०१८ पासून अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपुर, लातुर, उस्मानाबाद, औरंगाबाद व अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे या आठ ठिकाणी ‘एईपीडीएस’प्रणालीद्वारे म्हणजेच आधार जोडणी असल्याशिवाय धान्य देण्यात येणार नाही परंतु महाराष्टÑात नाशिकसह अन्य जिल्ह्यात मात्र पुर्वीच्याच पद्धतीने ‘पॉस’ यंत्राच्या सहाय्याने धान्य वितरण करण्यास मुभा दिली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाला मात्र रेशन दुकानदाराकडे ओळखीचा अन्य पुरावा सादर करावा लागणार आहे व त्याची खात्री पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत केली जाणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक