शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अखेर मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:10 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुविधा नसल्याने विद्यापीठाकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते.

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुविधा नसल्याने विद्यापीठाकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आरोग्य विद्यापीठ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संंयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालय येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याला शासनाने मान्यता दिली आहे.नाशिकमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुरू केलेल्या प्रयत्नातून या विषयाला चालना मिळाली आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केल्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विषय मार्गी लागला आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूणच विद्यार्थीसंख्येत वाढ होणार आहे. सदर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील खाटा, रुग्णकक्ष,शस्त्रक्रिया विभागांचा वापर करण्यात येणार असून, या संदर्भात आरोग्य विद्यापीठ व आरोग्य सेवा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरल्याचेही म्हैसेकर यांनी सांगितले. शासनाने या संदर्भातील शासन निर्णय सोमवार दि. २२ रोजी काढला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाकरिता अधिकच्या सर्व कंत्राटी सेवा तसेच शैक्षणिक उपक्रमासाठी येणारा सर्व प्रकारचा खर्च, वेतन इत्यादी बाबतची कार्यवाही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक उपक्रमाकरिता जमा होणारे शुल्क, मिळणारा शासकीय निधी यांची व्यवस्था अधिष्ठाता बघणार आहेत. लवकरच डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सहकार्य करणार आहे. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीचक्रधर मुंघल यांनी सदर प्रकल्प तयार केला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असून, जागतिकस्तरावरील अद्ययावत शिक्षण घेण्याच्या वाटा उपलब्ध होणार आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेता यावे यासाठी हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे. यापूर्वी नाशिकच्या विद्यार्थ्यांना अन्य मोठ्या शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जावे लागत होते.पालकमंत्र्यांचा शब्द खरा ठरलाआरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रस्तावाला पुढील आठवड्यात परवानगी मिळू शकते, अशी शक्यता वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मागील आठवड्यात दि.१४ रोजी जिल्हा आढावा बैठकीत जाहीरपणे वर्तविली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयाचा प्रश्न निकाली काढण्याबाबतची ठाम भूमिका घेत त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला प्रस्ताव दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार आठ दिवसांत थेट शासन निर्णयच जाहीर झाला.

टॅग्स :Healthआरोग्यcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ