येवला : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फेचालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय स्तरावर पदवीग्रहण सोहळा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.या अनुषंगाने जगदंबा शिक्षण संस्था संचलित एसएनडी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, एसएनडी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, बाभूळगाव आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन्झोकेम उद्योगसमूहाचे प्रमुख भारत वर्मा हे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली . औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. कोलकटवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्र माच्या वेळी व्यासपीठावर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य भागवत, भड तसेच सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी.के. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्र म यशस्वितेसाठी प्रा. संदीप अहिरे, प्रा. व्ही. व्ही. जाधव, सुनील पवार, ज्ञानेश्वर थलकर, राजेंद्र खैरनार व सचिन कातकाडे आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सारिका जाधव यांनी केले. प्रा. गिरीश काशीद यांनी आभार मानले. (वार्ताहर )
एसएनडी शिक्षण संकुलात पदवीप्रदान समारंभ
By admin | Updated: May 8, 2016 23:04 IST