शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
4
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
5
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
6
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
7
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
8
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
9
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
10
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
11
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
12
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
13
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
14
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
15
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
16
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
17
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
18
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
19
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
20
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणुकीची अधिसूचना जारी

By admin | Updated: January 11, 2017 01:26 IST

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अधिसूचना जारी केली असून, मंगळवारपासून नामांकन भरणे सुरू केले असले तरी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक होऊन त्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  पदवीधर मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याची मुदत १७ जानेवारीपर्यंत असून, १८ रोजी छाननी व २० रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. ३ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मतदान घेण्यात येणार असून, ६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असली तरी, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. एक- दोन दिवसात महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने व त्याची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवरच प्रामुख्याने असल्यामुळे पदवीधर मतदारसंघासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना नेमण्यात आले असले तरी, त्यांच्याकडे नामांकन न दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख रामदास खेडकर यांनी कक्षाशी संलग्न अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यात निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.