शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

घाटमाथ्यावरच पावसाची कृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:23 IST

इगतपुरी : पावसाच्या प्रतीक्षेत भाताची लावणी खोळंबली

घोटी : एका दिवसाला दीडशे ते दोनशे मिलिमीटर आणि सरासरी तीन हजार पाचशे मिलिमीटर पाऊस होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात केवळ इगतपुरी शहर आणि घाटमाथा परिसरातच पाऊस होत असल्याने इतर भागात मात्र अद्यापही भाताच्या पेरण्या पावसाच्या प्रतीक्षेत रखडल्याचे दिसत आहे.मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी दहा टक्केही पाऊस झाला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान, इगतपुरी शहरात असलेल्या पर्जन्यमापक यंत्राची पावसाची आकडेवारी शासन अधिकृत ठरवत असल्याने याचा फटका तालुक्यातील इतर भागांना बसणार असून, शासनाने संपूर्ण तालुक्याची पावसाची सरासरी घेऊन ही आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.प्रचंड पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला आरंभीच्या पावसाने दगा दिला आहे. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र लागले. हे नक्षत्रही तालुक्यात कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. इगतपुरी तालुक्यात केवळ इगतपुरी शहर परिसर आणि घाटमाथ्यावरच समाधानकारक पाऊस होत असल्याने केवळ शहराची पावसाची आकडेवारी फुगली आहे. हीच आकडेवारी संपूर्ण तालुक्याची दर्शवित इगतपुरी तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे; मात्र वस्तुस्थिती याउलट असून, केवळ शहर आणि परिसरात पाऊस होत असून, इतर भागात मात्र पावसाचे दर्शनही झाले नसल्याने खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या असल्याचे चित्र तालुक्यातील इतर भागात पाहण्यास मिळत आहे. विहीर, नदीच्या पाण्यावर भाताची लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व नदीतील पाणी उचलण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी भाताची लागवड विहीर आणि नदीच्या पाण्यावर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; मात्र विजेच्या सावळ्या गोंधळामुळे व अनियमित वीजपुरवठ्यामुळे या लागवडीही रखडल्या आहेत.