शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

जि.प. अध्यक्षपदाची निवडणूक २१ रोजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 7:22 PM

नाशिकसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू असताना युती सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांना चार महिन्यांची

ठळक मुद्देआठ दिवसांची मुदत : निवडणूक घेण्याच्या सूचनागेल्या महिन्यातच अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सप्टेंबर महिन्यात मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली चार महिन्यांची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने नवीन अध्यक्ष व पदाधिका-यांची निवडणूक घेण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, पदाधिकाºयांची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

नाशिकसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू असताना युती सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांना चार महिन्यांची मुदतवाढ देणारा निर्णय २३ आॅगस्ट २०१९ रोजी काढले होते. या मुदतवाढीमागे दोन कारणे होती. त्यात प्रामुख्याने चालू वर्षात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पदाधिका-ना जवळपास चार महिने कोणतेही कामकाज करता आले नव्हते, त्याचबरोबर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीवरून पक्षांतर्गत राजी-नाराजी घडून त्यातून सत्ताधाºयांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती ते टाळण्यासाठी सरकारने चार महिन्यांची मुदतवाढ विद्यमान पदाधिकाºयांना दिली. त्यातही एक महिन्यांचा काळ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोणतेही कामकाज करता आले नव्हते. आचारसंहिता संपुष्टात येताच मात्र पदाधिकाºयांनी कामकाजाला गती दिली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाधिकाºयांची मुदत संपुष्टात येण्याच्या शक्यतेने गेल्या महिन्यातच अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. जिल्हा परिषदांबरोबरच महापालिकेच्याही महापौरांनाही सरकारने मुदत दिली होती. मात्र त्यांची नोव्हेंबर महिन्यातच निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेबाबत शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा होती. ती मंगळवारी संपुष्टात आली. ग्रामविकास विभागाने या संदर्भातील आदेश काढून येत्या २० डिसेंबर रोजी पदाधिकाºयांची मुदतवाढ संपुष्टात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापतींच्या निवडणुका घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत.नाशिक जिल्हा परिषदेलाही ग्रामविकास विभागाचे आदेश प्राप्त झाले असून, प्रशासनाने निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र अध्यक्ष, पदाधिकाºयांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी नियमानुसार दहा दिवसांचा कालावधी द्यावा लागतो. विद्यमान पदाधिकाºयांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असली, त्याच दिवशी अथवा तत्पूर्वी या निवडणुका घेणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य असल्याने साधारणत: २१ डिसेंबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद